परिंटेड लेगिन्सऔरंगाबाद, दि. १ : ट्रेंडी लुक हवा असेल तर जीन्स, स्कर्ट, लेगिन्स, शॉर्टस् असे पर्याय तरुणींना उपलब्ध आहेत. कॉटनच्या प्लेन लेगिन्सव्यतिरिक्त दुसरे काही शोधत असाल तर तुमच्यासाठी प्रिंटेड लेगिन्स हा पर्याय उपलब्ध आहे. दिसायला अगदी आकर्षक असा हा पर्याय सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय होत आहे. जीन्स, शॉर्टस् असे वेस्टर्न पर्यायांसोबत प्रिंटेड लेगिन्सचा एक चांगला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. लेगिन्स हा बॉडी फिटिंगचा एक प्रकार असतो. कॉटनमध्ये आणि प्लेन तेही एकाच रंगात त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यातला नवा प्रकार म्हणजे जॉर्जेटच्या प्रिंटेड लेगिन्स. त्या जॉर्जेटच्या असल्या तरी अंगाला टोचत नाहीत. तसेच या एकाच रंगात नसून, त्यावर स्नेक, टायगर, चिता, बार्बी, गॅलक्सी प्रिंटेड लेगिन्स, अशा अनेक प्रकारच्या प्रिंट येत असतात. त्यामुळे त्याच्यावर कोणताही स्टाइलिश-ट्रेंडी टॉप, शर्ट मॅच होऊन जातो. विशेष म्हणजे या लेगिन्स पूर्ण लांबीच्या मिळतात. त्यामुळे त्या तशा वापरता येतात; शिवाय त्या स्ट्रेचेबल असल्यामुळे वरती ओढून त्याला गुडघ्यापर्यंतही घेता येईल. त्यामुळे फुल आणि थ्री फोर्थ, अशा दोन स्टाईल एकाच लेगिन्समध्ये करता येतील. त्यामुळे कॉलेजसह पार्ट्यांमध्येही या लेगिन्स वापरता येतील. या लेगिन्सवर शॉर्ट टॉप किंवा लाँग टॉपही वापरता येतील. कुर्तीज आणि ट्युनिक्स अशा दोन्ही स्टाईलचे टॉप त्यावर सुंदर दिसतील. त्याशिवाय टी शर्टस्, स्लिवलेस कुर्तीज प्रिंटेड लेगिन्सवर शोभून दिसतील. प्रिंटेड लेगिन्सवर प्लेन टॉप सुंदर दिसतात; पण प्रिंटेड टॉप्सही त्यावर छान दिसतील यात शंका नाही.
फॅशन
प्रिंटेड लेगिन्स
By admin | Updated: September 1, 2014 20:00 IST2014-09-01T20:00:25+5:302014-09-01T20:00:25+5:30
प्रिंटेड लेगिन्स
