नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाईने कुटुंबाचे बजेट कोलमडले. उद्योग संघटना असोचॅमने केलेल्या एका अभ्यासात मुख्यत: भाजीपाल्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचे पारिवारिक बजेट वाढले आहे. देशभरातील 33 बाजारात केलेल्या अभ्यासानुसार सरासरी किरकोळ विक्रेता ठोक विक्री किमतीपेक्षा 48.8 टक्के महाग दरात भाजीपाला विकत आहे.
असोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले की, ‘भारतातील विविध बाजारातील भाज्यांचे ठोक विक्री मूल्य आणि किरकोळ किमतींच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे. किरकोळ विक्रेता विविध बाजारातून कोणत्या दरात खरेदी करत आहे, याचे संकेत ठोक विक्रीमूल्यातून मिळतात. ज्या दरात ग्राहक किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी करत आहे, ती किरकोळ किंमत म्हणून ओळखली जाते.’
या अभ्यासानुसार, भाज्यांमध्ये पत्ता गोबीच्या किरकोळ आणि ठोक विक्री मूल्यातील फरक 69.4 टक्क्यांनी वाढून 78.1 टक्के झाला. वांग्याच्या बाबतीत हे अंतर 62.4 टक्क्यांनी वाढून 66.7 टक्के झाले आणि फुलगोबीबाबत हा फरक ठोक विक्री मूल्याच्या तुलनेत 59 टक्क्यांहून अधिक राहिला. सुरतमध्ये किरकोळ आणि ठोक विक्री मूल्यातील फरक 49.7 टक्क्यांनी वाढून 5क्.8 टक्के राहिले. लखनौमध्ये हेच अंतर 48.5 टक्क्यांनी उंचावून 54.8 टक्के, शिमला येथील बाजारात 37.9 टक्क्यांवरून 47.3 टक्क्यांवर गेले.
2क्13-14 मध्ये कांद्याची आवक 13 टक्क्यांनी वाढली. याच काळात टमाटय़ाची आवक 7.9 टक्के आणि बटाटय़ाची ताजा आवक 6.2 टक्क्यांच्या दराने वाढली. भेंडी आणि फुलगोबीची आवक क्.4 टक्क्यांवरून किरकोळ वाढीसह 1.9 टक्के झाली.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या मते, यंदा कमजोर नैऋत्य मान्सूनमुळे खरीप पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे अन्नधान्य महागाईत वाढ होण्याचे संकेत आहेत. 1 जून ते 4 जुलै 2क्14 या दरम्यान देशात एकूण वार्षिक सरासरीच्या 43 टक्क्यांनी कमी पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार आणि कर्नाटक यांसह प्रमुख खाद्यान्न उत्पादक राज्यांनी 2क्12-13 या आर्थिक वर्षात देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात सुमारे 82 टक्के योगदान दिले होते. याच काळात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह नगदी पीक उत्पादक राज्यांनी यांच्या उत्पादनात 87 टक्के एवढे योगदान दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)