बिहार विधानसभेच्या निवडणुकीत रालोआला बसलेला पराभवाचा धक्का, रुपयाचे घसरत असलेले मूल्य, चलनवाढीच्या निर्देशांकात झालेली वाढ, घसरलेले औद्योगिक उत्पादन अशा नकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारात सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये घट झाली. बुधवारी बाजारात झालेल्या मुहूर्ताच्या व्यवहारांच्या विशेष सत्रामध्ये बाजाराच्या निर्देशांकात झालेली वाढ हा केवळ एकच अपवाद वगळता गतसप्ताह निराशेचाच राहिला. ‘नमनाला घडाभर तेल’ या म्हणीची शेअर बाजाराने आठवण करून दिली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस २५६१०.५३ अंशांवर बंद झाला. सप्ताहभरात या निर्देशांकात २.५ टक्के म्हणजे ६५४.७१ अंशांची घट झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १९२.०५ अंशांनी खाली येऊन ७७६२.२५ अंशांवर बंद झाला. परकीय वित्तसंस्थांनी बाजारात विक्री केल्याने निर्देशांक खाली येण्यास हातभार लागलेला दिसून आला. आंतरराष्ट्रीय वातावरणही नकारात्मक राहिले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बसलेल्या पराभवाच्या धक्क्याने बाजार खाली येणे अपेक्षितच होते. त्याच जोडीला डॉलरच्या तुलनेत घसरत असलेले रुपयाचे मूल्य तसेच जगभरातील बाजारांमध्ये असलेले नकारात्मक वातावरण याचाही फटका बाजाराला बसला आणि विक्रीचा दबाव वाढून बाजार खाली आला. सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांक घसरला.
देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली घट ही आणखी एक काळजीची बाब आहे. सप्टेंबर महिन्यात हे उत्पादन ३.६ टक्के एवढे खाली आले आहे. देशातील अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे आॅक्टोबर महिन्यात चलनवाढीच्या निर्देशांकात सलग तिसऱ्या महिन्यामध्ये वाढ झाली आहे. आता हा निर्देशांक पाच टक्कयांवर पोहोचला आहे. याचा फटकाही बाजाराला सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षीही शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांत तेजी दिसून आली होती. त्यानंतर मात्र वर्षभरात सेन्सेक्स हजारपेक्षाही जास्त अंकांनी खाली आला आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती आगामी वर्षात होऊ नये, अशीच गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
शेअर बाजारात नमनाला घडाभर तेल
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत रालोआला बसलेला पराभवाचा धक्का, रुपयाचे घसरत असलेले मूल्य, चलनवाढीच्या निर्देशांकात झालेली वाढ, घसरलेले औद्योगिक उत्पादन अशा नकारात्मक
By admin | Updated: November 16, 2015 00:06 IST2015-11-16T00:06:23+5:302015-11-16T00:06:23+5:30
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत रालोआला बसलेला पराभवाचा धक्का, रुपयाचे घसरत असलेले मूल्य, चलनवाढीच्या निर्देशांकात झालेली वाढ, घसरलेले औद्योगिक उत्पादन अशा नकारात्मक
