Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने व चांदीच्या किंमतीत घसरण

सोने व चांदीच्या किंमतीत घसरण

जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती उतरल्यामुळे ,तसेच दागिने व किरकोळ ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे सराफा बाजारातील सोन्याचे भाव ५० रुपयाने खाली उतरले.

By admin | Updated: March 23, 2015 23:46 IST2015-03-23T23:46:30+5:302015-03-23T23:46:30+5:30

जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती उतरल्यामुळे ,तसेच दागिने व किरकोळ ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे सराफा बाजारातील सोन्याचे भाव ५० रुपयाने खाली उतरले.

Falling at the price of gold and silver | सोने व चांदीच्या किंमतीत घसरण

सोने व चांदीच्या किंमतीत घसरण

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती उतरल्यामुळे ,तसेच दागिने व किरकोळ ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे सराफा बाजारातील सोन्याचे भाव ५० रुपयाने खाली उतरले.
राजधानीत सोने आज १० ग्रॅममागे २६.४५० रुपयाला विकले गेले. आद्योगिक बाजारही मंदावल्यामुळे चांदीचे भावही ४०० रुपयाने कमी झाले असून, दर किलोमागे ३७,६०० रुपये प्रती किलो दराने चांदीची विक्री झाली.
सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव औसामागे ११८२.३० डॉलर राहिला व चांदीचा भाव ०.२१ टक्के कोसळून औसामागे १६.६९ डॉलर राहिला.
दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोने १० ग्रँममागे २६,४५० व ९९.५० टक्के स्टँडर्ड सोने २६.३०० रुपये अशाी विक्री झाली. चांदीच्या नाण्यांचे भाव १००० रुपयाने उतरुन ५५ हजार ते ५६ हजार प्रती शेकडा राहिले.

Web Title: Falling at the price of gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.