Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या भावात नफेखोरीने घसरण

सोन्याच्या भावात नफेखोरीने घसरण

सलग नवव्या दिवशी राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.

By admin | Updated: August 26, 2014 00:52 IST2014-08-26T00:33:57+5:302014-08-26T00:52:20+5:30

सलग नवव्या दिवशी राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.

Falling gold prices profits | सोन्याच्या भावात नफेखोरीने घसरण

सोन्याच्या भावात नफेखोरीने घसरण

नवी दिल्ली : सलग नवव्या दिवशी राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर साठेबाजांनी नफेखोरी केल्याने सोन्याचा भाव ७० रुपयांच्या घसरणीसह २८,०३० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तथापि, चांदीचा भाव मात्र औद्योगिक संस्थांकडून पुरेशी मागणी मिळाल्याने ४२,६०० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर साठेबाजांनी नफेखोरी केली. जागतिक बाजार सोन्याच्या भावाने दोन महिन्यांचा नीचांक गाठला. याचा स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. सिंगापूर बाजारातच सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी कमी होऊन १,२७४.४५ डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७० रुपयांनी घटून अनुक्रमे २८,०३० रुपये आणि २७,८३० रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. गेल्या आठ सत्रांमध्ये या मौल्यवान धातूत ७२० रुपयांची घट झाली.

Web Title: Falling gold prices profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.