नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २७,२५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीअभावी चांदीचा भावही ३५० रुपयांनी कमी होऊन ३६,९५० रुपये प्रतिकिलो राहिला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने या मौल्यवान धातूंची आयात स्वस्त झाली. याचा या धातूंवर दबाव राहिला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव ०.१८ टक्क्यांच्या घटीसह १,२०८.९० डॉलर आणि चांदीचा भाव ०.९४ टक्क्यांनी कमी होऊन १६.३८ डॉलर प्रतिऔंस राहिला.
तयार चांदीचा भाव ३५० रुपयांच्या घसरणीसह ३६,९५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४८० रुपयांनी घटून ३६,९४५ रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६१,००० रुपये व विक्रीकरिता ६२,००० रुपये प्रतिशेकड्यावर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,२५० रुपये व २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात काल २२० रुपयांची घट नोंदली गेली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २३,८०० रुपयांवर कायम राहिला.
मागणीअभावी सराफ्यात घसरण
जागतिक पातळीवरील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २७,२५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
By admin | Updated: January 9, 2015 23:41 IST2015-01-09T23:41:49+5:302015-01-09T23:41:49+5:30
जागतिक पातळीवरील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २७,२५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
