मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता जवळपास मावळली असल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी पडझड झाली. सेन्सेक्स १0२ अंकांनी घसरून २७,४५९.२३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही सलग चौथ्या सत्रातील घसरण ठरली. रिअल्टी आणि वाहन उद्योग क्षेत्रातील समभागांत विक्रीचा जोर राहिल्याने बाजार खाली आला.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. सत्राच्या अखेरपर्यंत घसरण कायम राहिली. ४ आॅगस्ट रोजी रिझर्व्ह पत धोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. या आढाव्यात व्याजदरांत कपात होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे. रिझर्व्ह बँक आहे ती स्थिती कायम ठेवील असे ब्रोकरेज कंपन्या मॉर्गन स्टॅनले, आरबीआय आणि डीबीएस यांनी म्हटले आहे.
सकाळच्या तेजीनंतर सेन्सेक्स २७,४१६.३९ अंकांपर्यंत घसरला होता. सत्राअखेरीस १0२.१५ अंकांची अथवा 0.३७ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,४५९.२३ अंकांवर बंद झाला. १९ जूननंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. गेल्या चार सत्रांपासून सेन्सेक्स घसरत आहे. या चार दिवसांत सेन्सेक्सने १,0४५.७0 अंक गमावले आहेत. पी-नोटस्विषयीच्या कडक नियमांची भीती आणि चिनी शेअर बाजारातील घसरण याचा फटका सेन्सेक्सला बसला आहे. (वृत्तसंस्था)
रिअल्टीला सर्वाधिक फटका
क्षेत्रनिहाय विचार करता रिअल्टीला सर्वाधिक २.७२ टक्क्यांचा फटका बसला. त्याखालोखाल आरोग्य, धातू, वाहन, तेल आणि गॅस आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात घसरण झाली. बाजारातील घसरण व्यापक होती. मीडकॅप निर्देशांक 0.१८ टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप निर्देशांक 0.१७ टक्क्यांनी खाली आला.
बीएसईमधील घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत
डॉ. रेड्डीज, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, बजाज आॅटो, भारती एअरटेल, सिप्ला, टाटा स्टील, विप्रो, कोल इंडिया, गेल, एमअँडएम, ओएनजीसी आणि लुपिन यांचा समावेश आहे.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0पैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरणीच्या या माहौलमध्ये मारुती सुझुकीच्या समभागांनी मात्र चांगली कामगिरी केली. 0.४६ टक्क्यांची वाढ मिळवून कंपनीचा समभाग ४,१९५.६५ अंकांवर बंद झाला. आशियातील अन्य बाजारांत संमिश्र कल दिसून आला. चीनचा शांघाय कंपोजिट दिवसभर कमालीचा अस्थिर राहिला. युरोपीय बाजारांत सकाळच्या सत्रात खरेदीचा जोर दिसून आला.
काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी दर्शविली.
शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात घसरण
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता जवळपास मावळली असल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी पडझड झाली. सेन्सेक्स १0२ अंकांनी घसरून २७,४५९.२३ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: July 29, 2015 02:05 IST2015-07-29T02:05:03+5:302015-07-29T02:05:03+5:30
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता जवळपास मावळली असल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी पडझड झाली. सेन्सेक्स १0२ अंकांनी घसरून २७,४५९.२३ अंकांवर बंद झाला.
