Lokmat Money > बिझनेस न्यूज > चार दिवसांच्या तेजीनंतर सराफ्यात घसरण

चार दिवसांच्या तेजीनंतर सराफ्यात घसरण

मागणीअभावी स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव २२० रुपयांनी घटून २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

By admin | Updated: January 8, 2015 23:45 IST2015-01-08T23:45:31+5:302015-01-08T23:45:31+5:30

मागणीअभावी स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव २२० रुपयांनी घटून २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Falling for four days at the bullion market | चार दिवसांच्या तेजीनंतर सराफ्यात घसरण

चार दिवसांच्या तेजीनंतर सराफ्यात घसरण

नवी दिल्ली : चार दिवसांच्या तेजीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी तेजीचा कल नोंदला गेला. मागणीअभावी स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव २२० रुपयांनी घटून २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव २५० रुपयांनी घसरून ३७,३०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर मागणी घटल्याने व जागतिक सराफ्यात घसरणीचा कल राहिल्याने स्थानिक बाजारात घट नोंदली गेली. जागतिक शेअर बाजारात तेजी परतल्याने ही घसरण राहिली.
सिंगापूरात सोन्याचा भाव ०.५ टक्क्याने घटून १,२०४.९७ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.४ टक्क्याने कमी होऊन १६.४७ डॉलर प्रतिऔंसवर राहिला.
तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी घटून ३७,३०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १८५ रुपयांच्या घसरणीसह ३७,४२५ रुपये प्रतिकिलोवर आला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६१,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६२,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. तथापि, सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,८०० रुपयांवर कायम
राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २२० रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे २७,३५० रुपये व २७,१५० रुपये प्रतिकिलो राहिला.
यात गेल्या चार दिवसांत ५४५ रुपयांची वाढ झाली होती.

Web Title: Falling for four days at the bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.