Lokmat Money > बिझनेस न्यूज > वित्त वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसरण

वित्त वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसरण

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आशिया आणि युरोपीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्स ७२ अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांच्या

By admin | Updated: April 2, 2016 03:45 IST2016-04-02T03:45:42+5:302016-04-02T03:45:42+5:30

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आशिया आणि युरोपीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्स ७२ अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांच्या

Falling on the first day of the financial year | वित्त वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसरण

वित्त वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसरण

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आशिया आणि युरोपीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्स ७२ अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे ही घसरण उडाली.
पाच आठवड्यात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टीत साप्ताहिक घसरणीची नोंद झाली. या सप्ताहात सेन्सेक्स 0.२६ टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टीचीसुद्धा 0.0४ टक्क्यांनी घसरण झाली.
गुरुवारी संपलेल्या वित्तीय वर्षात सेन्सेक्सने गेल्या चार वर्षातील सर्वात वाईट प्रदर्शन केले. २0१५-१६ या वित्तीय वर्षात सेन्सेक्स ९.३६ टक्क्यांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले. मावळलेल्या वित्तीय वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १८ हजार कोटी रुपये काढून घेतले.

मुंबई शेअर बाजारातील ३0 शेअर असलेला सेन्सेक्स शुक्रवारी २५,३0१.७0 अंकावर खुला झाला. दिवसभर खाली-वर होत अखेरीस तो २५,२६९.६४ वर बंद झाला. गेल्या २ सत्रात सेन्सेक्स ४४१.४0 अंकांनी वधारला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा नफेखोरीमुळे २५.३३ अंकांनी घसरून ७,७१३.0५ अंकांवर बंद झाला.

Web Title: Falling on the first day of the financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.