Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारांमध्ये सलग पाचव्या सत्रात झाली घसरण

शेअर बाजारांमध्ये सलग पाचव्या सत्रात झाली घसरण

शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने महत्त्वाचे निर्देशांक सलग पाचव्या दिवशी घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१ अंकांनी

By admin | Updated: December 18, 2014 04:58 IST2014-12-18T04:58:05+5:302014-12-18T04:58:05+5:30

शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने महत्त्वाचे निर्देशांक सलग पाचव्या दिवशी घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१ अंकांनी

Falling for the fifth consecutive session in the stock market | शेअर बाजारांमध्ये सलग पाचव्या सत्रात झाली घसरण

शेअर बाजारांमध्ये सलग पाचव्या सत्रात झाली घसरण

मुंबई : शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने महत्त्वाचे निर्देशांक सलग पाचव्या दिवशी घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१ अंकांनी घसरून २६,७२४.0१ अंकांवर बंद झाला. आॅटो, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रात पडझड दिसून आली.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी घसरणीसह २६,७२४.0१ अंकांवर उघडला. त्यानंतर बाजार हळूहळू सावरू लागला. एका क्षणी तो २६,८७१.९१ अंकांवर गेला होता. मात्र ही गती कायम राहू शकली नाही. सत्र अखेरीस ७१.३१ अंकांची अथवा 0.२७ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,७१0.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्स १,१२0.९७ अंकांनी खाली आला आहे.
व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी घसरून ८ हजारांच्या खाली गेला होता. तथापि, नंतर थोडी सुधारणा होऊन तो ८,0२९.८0 अंकांवर बंद झाला. ३७.८0 अंकांची अथवा 0.४६ टक्क्यांची घसरण त्यात झाली. तो दिवसभर ७,९६१.३५ ते ८,0८२ अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला.
विदेशी संस्थांकडून तसेच छोट्या गुंतवणूकदारांकडून झालेला विक्रीचा मारा, वाढलेली व्यापारी तूट आणि घसरलेला रुपया ही बाजारांच्या घसरणीची प्रमुख कारणे आहेत, असे ब्रोकरांनी सांगितले. दरम्यान, काल विदेशी संस्थांनी १,२४७.२४ कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सिप्ला, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, टाटा पॉवर, मारुती सुझुकी, बजाज आॅटो, टाटा मोटर्स, एमअँडएम, एलअँडटी, भेल, एनटीपीसी, एचडीएफसी बँक आणि हिंद युनिलिव्हर यांचे समभाग घसरले. त्याचा परिणाम होऊन सेन्सेक्स खाली आला.
आरआयएल, गेल, सेसा स्टरलाईट, ओएनजीसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग वाढले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप कंपन्यांच्या समभागांतही विक्रीचा जोर दिसून आला.

Web Title: Falling for the fifth consecutive session in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.