Lokmat Money > बिझनेस न्यूज > मागणीअभावी सराफा बाजारात घसरण

मागणीअभावी सराफा बाजारात घसरण

जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव १९० रुपयांच्या घसरणीसह २७,६१० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

By admin | Updated: September 12, 2014 00:44 IST2014-09-12T00:44:15+5:302014-09-12T00:44:15+5:30

जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव १९० रुपयांच्या घसरणीसह २७,६१० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

Falling on the bullion market demand | मागणीअभावी सराफा बाजारात घसरण

मागणीअभावी सराफा बाजारात घसरण

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव १९० रुपयांच्या घसरणीसह २७,६१० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही २७० रुपयांनी घटून ४१,९०० रुपये प्रतिकिलोवर आला.
सिंगापुरात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरून १२४६.५३ डॉलर व चांदीचा भाव ०.३ टक्क्यांच्या घसरणीसह १८.९१ डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १९० रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे २७,६१० रुपये व २७,४१० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,५०० रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव २७० रुपयांच्या घसरणीसह ४१,९०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३१० रुपयांनी घटून ४१,८९० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. तिकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयाच्या तेजीसह ७४,००० ते ७५,००० रुपये प्रतिशेकड्यावर गेला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Falling on the bullion market demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.