नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरून २७,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी कमजोर राहिल्यानेही बाजारात घसरणीचा कल दिसून आला. औद्योगिक संस्थांच्या मर्यादित पाठबळाने चांदीचा भाव ३८,००० रुपये किलोवर कायम राहिला.
बाजार सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने पर्यायी गुंतवणुकीसाठी सोन्याच्या पसंतीत घट नोंदली गेली. यामुळे बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५२ टक्क्यांच्या घसरणीसह १,२०७.७० डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भावही ०.८३ टक्क्यांनी घटून १६.८३ डॉलर प्रतिऔंस राहिला.
दुसरीकडे सट्टेबाजांच्या पाठबळाने तयार चांदीचा भाव ३८,००० रुपयांवर, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १७० रुपयांच्या घसरणीने ३७,७२० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दरम्यान, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५७,००० रुपये व विक्रीकरिता ५८,००० रुपये प्रतिशेकड्याच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात घसरणीचा कल
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरून २७,१५० रुपये प्रति
By admin | Updated: April 9, 2015 00:11 IST2015-04-09T00:11:16+5:302015-04-09T00:11:16+5:30
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरून २७,१५० रुपये प्रति
