नवी दिल्ली : भारतीय सांख्यिकी संस्था अर्थात आयएसआय आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांच्या बनावट नोटांबाबत एकत्रितपणो अभ्यास करणार आहेत. यामध्ये विशेषत: सीमेपलीकडून येणा:या बनावट नोटांच्या धाटणीचा अभ्यास केला जाईल.
आयएसआयच्या अभ्यासाद्वारे एनआयएला बनावट नोटांच्या प्रसार पद्धतीचा छडा लावणो आणि त्यावर अंकुश मिळविण्यासाठी मदत होईल. आर्थिक गुन्हे परिषदेची गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत नकली नोटांच्या अभ्यासावर भर देण्यात आला होता, असे सूत्रंनी सांगितले.
बनावट नोटांबाबतच्या प्रकरणांचा अनेक संस्था तपास करीत आहेत. त्यांचे विश्लेषण वेगवेगळे आहे. एका सरकारी यंत्रणोला यांचा टप्प्या-टप्प्याने अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे या सूत्रंनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘