नवी दिल्ली : एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष सरकार बदलायचा विचार असून, असे झाल्यास व्यापार, उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसेल असा इशारा असोचमने रविवारी दिला.
आर्थिक वर्ष बदलल्याने काहीही साध्य न होता फार मोठा अडथळा येऊन देशाचा व्यापार आणि उद्योगाचे फार मोठे नुकसान होईल, असे असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडियाने (असोचेम) रविवारी निवेदनात म्हटले.
नवे आर्थिक वर्ष शोधण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना निवेदनात विरोध करण्यात आला. वेगवेगळ््या देशांमध्ये आर्थिक वर्ष वेगवेगळ््या पद्धतीने विचारात घेतले जाते. जगात आर्थिक वर्षासाठी एकच एक अशी पद्धत नाही. त्यामुळे कोणत्याही नव्या पद्धतीने आर्थिक वर्ष तयार करण्याचे भारताला जगासोबत आणण्याशिवाय इतर कुठल्याही प्रकारे फायद्याचे ठरणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. अर्थव्यवस्थेसाठीही असा बदल करण्याचे कोणतेही निश्चित असे कारण नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आर्थिक वर्ष बदलणे धोक्याचे : असोचेम
एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष सरकार बदलायचा विचार असून, असे झाल्यास व्यापार, उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसेल असा इशारा असोचमने रविवारी दिला.
By admin | Updated: July 11, 2016 04:29 IST2016-07-11T04:29:28+5:302016-07-11T04:29:28+5:30
एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष सरकार बदलायचा विचार असून, असे झाल्यास व्यापार, उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसेल असा इशारा असोचमने रविवारी दिला.
