नवी दिल्ली : निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जोरात तयारी केली जात आहे. या कार्यासाठी निर्गुंतवणूक विभाग एका जनसंपर्क संस्थेची नेमणूक करणार आहे.
निर्गुंतवणूक विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकण्यासाठी सरकार आरंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ), अनुवर्ती सार्वजनिक प्रस्ताव (एफपीओ) आणि विक्री प्रस्ताव (ओएफएस) या माध्यमांचा वापर करणार आहे. या विविध प्रकारच्या प्रस्तावांची जाहिरात करणे, तसेच जनसंपर्क पाहणे अशी कामे नेमण्यात येणाऱ्या संस्थेकडे दिली जातील.
निर्गुंतवणुकीला फेसबुक, ट्विटरचा आधार
निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे
By admin | Updated: January 4, 2015 22:27 IST2015-01-04T22:27:23+5:302015-01-04T22:27:23+5:30
निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे
