नवी दिल्ली : येत्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाणार आहे. त्यात धोरणात व्याजाचा दर ०.५० टक्क्यांनी कमी करण्याची बाजारपेठेला अपेक्षा आहे. नियंत्रणात असलेली चलनवाढ आणि सरकारची सकल देशी उत्पादनातील तूट ३.५ टक्क्यांवर आणण्याचे प्रयत्न या अपेक्षेला कारणीभूत आहे.
सरकारने छोट्या बचतीवरील व्याजदर १.३ टक्क्यांनी कमी केला आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करण्यासाठी पार्श्वभूमी तयार झाली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली
होती.
रिझर्व्ह बँकेकडून दरकपातीची अपेक्षा
येत्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाणार आहे.
By admin | Updated: April 4, 2016 02:38 IST2016-04-04T02:38:57+5:302016-04-04T02:38:57+5:30
येत्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाणार आहे.
