अरुण बारसकर, सोलापूर
आज पेट्रोलमध्ये ‘इथेनॉल’ मिश्रणाचे १० टक्के असलेले प्रमाण आगामी काळात १५ व त्यानंतर २० टक्के करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. त्यादृष्टीने राज्यातील आसवनी प्रकल्पांची उभारणी व क्षमतावाढीची कामे सुरू आहेत.
केंद्र सरकारने १९९५ मध्ये इथेनॉल निर्मितीसाठी महाराष्ट्रात एक पथदर्शी प्रकल्प दिला होता. ओयासिस शुगर इथेनॉल व स्टर्र्लिंग केमिकल्स सणसवाडी हा राज्यातील पहिला इथेनॉल प्रकल्प होय. या प्रकल्पातून तयार झालेल्या ‘इथेनॉल’ची पेट्रोलमध्ये मिश्रण चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. राज्याची गरज लक्षात घेतली असता सध्या राज्यात उत्पादित होणारे इथेनॉल पुरेसे नाही. नोव्हेंबर २०१६ पर्यंत मिश्रणाचे प्रमाण १० टक्के, तर २०१७ मध्ये हे प्रमाण १५ टक्के व पुढे ते २० टक्के इतके करण्याचा केंद्राचा मानस आहे.
‘इथेनॉल’चे परवडणारे दर व मागणी लक्षात घेता उत्पादन वाढीसाठी ‘बी’ हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास राज्य शासनाने परवानगी देण्याचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे नवीन प्रकल्प उभारणे, आहे त्या प्रकल्पांची क्षमता वाढविणे किंवा मोलॅसिसऐवजी ‘बी’ हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देणे गरजेचे आहे. तशी मागणी इथेनॉल असोसिएशन आॅफ इंडियाने केली आहे. यामुळे अल्कोहोल अधिक मिळेल मात्र साखरेचा उतारा कमी होईल. यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साखरेचा भावही वाढेल व ‘इथेनॉल’मुळे इंधनाची गरजही भागेल. हा निर्णय राज्य शासनाच्या हाती असून, राज्यातील वाढलेली साखर कारखानदारी व साखर दराच्या अडचणीमुळे संकटात आलेली कारखानदारी पाहता हा निर्णय अपेक्षित आहे.
सध्या राज्यात इथेनॉल निर्मितीचे ४८ प्रकल्प आहेत. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात २६, तर शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात चार प्रकल्प आहेत. म्हणजे ४८ पैकी ३० प्रकल्प सहा जिल्ह्यांत आहेत. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत प्रत्येकी ८ प्रकल्प आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चार, तर सांगली-सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी तीन प्रकल्प आहेत. शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात चार प्रकल्प कार्यान्वित आहेत. रायगडसारख्या कोकणपट्ट्यातील जिल्ह्यातही दोन इथेनॉल प्रकल्प आहेत.
इथेनॉल मिश्रण जाणार २० टक्यापर्यंत
आज पेट्रोलमध्ये ‘इथेनॉल’ मिश्रणाचे १० टक्के असलेले प्रमाण आगामी काळात १५ व त्यानंतर २० टक्के करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
By admin | Updated: December 25, 2015 01:21 IST2015-12-25T01:21:04+5:302015-12-25T01:21:04+5:30
आज पेट्रोलमध्ये ‘इथेनॉल’ मिश्रणाचे १० टक्के असलेले प्रमाण आगामी काळात १५ व त्यानंतर २० टक्के करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
