चंद्रकांत जाधव, जळगाव
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एकवर आहे.
या वर्षी मान्सूनचे आगमन १३ जुलैनंतर झाले. यामुळे इतर पिकांच्या लागवडीचा किंवा पेरणीचा काळ निघून गेला. कापूस लागवडीची मुदत तेवढी शिल्लक होती. यामुळे कापूस लागवडीत वाढ झाल्याचे कापूस सल्लागार मंडळाने (सीएबी) म्हटले आहे.
देशात मध्य भारतात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे, तर सर्वात कमी लागवड ही उत्तर भारतात झाली आहे. २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड देशात १० टक्क्यांनी वाढली आहे, तर सूतगिरण्यांच्या कार्यक्षेत्रात १६.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या हंगामात ३८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या हंगामात ती ४१ लाख हेक्टरवर पोहोचली आहे.
कोरडवाहू कापसाला हवे पाणी
सद्य:स्थितीत कोरडवाहू कापसाला पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास उत्पादनात १० टक्क्यांनी घट होऊ शकते; परंतु कॉटन असोसिएशन आॅफ इंडिया (सीएआय) च्या सर्वेक्षणानुसार या कापूस हंगामात देशात ४०३ लाख गाठींचे उत्पादन होईल, तर कापूस सल्लागार मंडळाच्या अंदाजानुसार देशात ४०० लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते.
शहादा (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक आर.डी. पाटील यांनी सांगितले की, चीनचे धोरण जागतिक कापूस बाजारपेठेवर परिणाम करते. यंदा कापूस लागवडीत वाढ झाली आहे. विविध संस्थांचे अंदाज येत आहेत. उत्पादन भरपूर होईल; पण त्या दृष्टीने कापूस धोरणही असायला
हवे.
४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एकवर आहे.
By admin | Updated: October 23, 2014 04:54 IST2014-10-23T04:54:14+5:302014-10-23T04:54:14+5:30
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एकवर आहे.