Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३७0 नवीन दूध उत्पादक संस्थांची छत्तीसगढमध्ये स्थापना

३७0 नवीन दूध उत्पादक संस्थांची छत्तीसगढमध्ये स्थापना

छत्तीसगढमध्ये ३७० नव्या सहकारी दूध समित्यांची स्थापना झाल्यामुळे रोजचे दूध संकलन सरासरी ६५ हजार लिटर झाले आहे.

By admin | Updated: March 31, 2015 01:17 IST2015-03-31T01:17:00+5:302015-03-31T01:17:00+5:30

छत्तीसगढमध्ये ३७० नव्या सहकारी दूध समित्यांची स्थापना झाल्यामुळे रोजचे दूध संकलन सरासरी ६५ हजार लिटर झाले आहे.

Establishment of 370 new milk producing companies in Chhattisgarh | ३७0 नवीन दूध उत्पादक संस्थांची छत्तीसगढमध्ये स्थापना

३७0 नवीन दूध उत्पादक संस्थांची छत्तीसगढमध्ये स्थापना

रायपूर : छत्तीसगढमध्ये ३७० नव्या सहकारी दूध समित्यांची स्थापना झाल्यामुळे रोजचे दूध संकलन सरासरी ६५ हजार लिटर झाले आहे.
छत्तीसगढ राज्य सहकारी दुग्ध महासंघाची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली असून महासंघाने १५ जिल्ह्यांत आपल्या कामाचा विस्तार केला आहे. यामुळे सक्रिय दूध सहकारी समित्यांची संख्या २५७ ने वाढून ६२७ झाली आहे. महासंघाची स्थापना झाल्यापासून ३७० नव्या दूध समित्यांची स्थापना झाली आहे. समित्यांच्या माध्यमातून १६ हजार पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी महासंघाच्या संपर्कात आले आहेत.
सध्या महासंघाकडून होणारे दैनंदिन दूध संकलन ६४ हजार ७८५ लिटर आहे. कोरबा ते पंखाजूरपर्यंत आणि राजनंदगाव ते जांजगीर चंपापर्यंत महासंघाचा विस्तार झाला आहे.
नजीकच्या भविष्यात नव्या जिल्ह्यांमध्येही महासंघाचा विस्तार होईल. छत्तीसगढ राज्य अस्तित्वात यायच्या आधी २००० मध्ये छत्तीसगढमध्ये दूध शीतकरणासाठी फक्त एक मोठे चिलिंग सेंटर बिलासपूरमध्ये कार्यरत होते व दुसरे मुख्य संयंत्र दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी येथे होत होते. गेल्या काही वर्षांत महासंघाने सारंगढ, रायगढ आणि पंखाजूरमध्ये पूर्णपणे नवे चिलिंग सेंटर सुरू केले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांत महासंघाच्या प्रयत्नांमुळे तीन चिलिंग सेंटरच्या क्षमतेचा विस्तार झाला. यात रायगढ जिल्ह्यातील सारंगढमध्ये चार हजार लिटर व महासमुंद जिल्ह्यात पाच हजार लिटर क्षमतेच्या नव्या चिलिंग सेंटरची स्थापना झाली आहे.

Web Title: Establishment of 370 new milk producing companies in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.