नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) योजनेसाठी वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २१ हजार रुपये केली आहे. याचाच अर्थ महिन्याला २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेले सर्व कर्मचारी-कामगार आता या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
ईएसआयसीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी झाली. जे कर्मचारी योजनेचे सदस्य आहेत; मात्र त्यांचा पगार आता २१ हजार रुपयांच्या वर गेला आहे, अशा कर्मचाऱ्यांना ही सेवा आता मिळणार नाही. निर्धारित सीमेपेक्षा जास्त वेतन असणाऱ्यांचे विमा कव्हर आपोआप समाप्त होईल. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले की, १५ हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्यांनाच आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळत होता. ही मर्यादा आता वाढवून २१ हजार करण्यात आली आहे. आॅक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईएसआयची मर्यादा केली २१ हजार रुपये
कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) योजनेसाठी वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २१ हजार रुपये केली आहे.
By admin | Updated: September 7, 2016 04:17 IST2016-09-07T04:17:52+5:302016-09-07T04:17:52+5:30
कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) योजनेसाठी वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २१ हजार रुपये केली आहे.
