नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पाच कोटींपेक्षा जास्त सदस्यांना २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्केच दराने व्याज मिळावे, अशी अर्थ मंत्रालयाची भूमिका आहे. मात्र, संघटनेला त्यापेक्षा जास्त व्याज दिले जावे असे वाटते.
ईपीएफओने २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात जमा भविष्य निधीवर ८.७५ टक्के व्याज दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक होऊन तीत अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात (२०१५-२०१६) व्याजदर ८.७५ टक्के असावा, असे सांगितले. विशेष म्हणजे सरकार अल्पबचत योजना आणि पीपीएफवर परताव्याचा दर कमी करण्याच्या विचारात आहे. ईपीएफओने चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्नाचा अंदाज आधीच काढून ठेवला आहे व त्याच आधारावर त्याने ८.७५ टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज दिले जाऊ शकते असे म्हटले. ९ डिसेंबर रोजी ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत व्याजदर निश्चित करण्याच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता नाही. कारण संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
पोस्टातील अल्पबचत आणि पब्लिक प्रोेव्हिडंट फंडसारख्या (पीपीएफ) लघु बचत योजनांवरील
व्याजदरांवर सरकार विचार करू शकते.रिझर्व्ह बँक आणि बँक अल्पबचत दरांमध्ये झालेली कपात आणि मौद्रिक धोरणाचा लाभ गुंतवणूकदारांना बाजारातील दरांप्रमाणे पोहोचावा यासाठी दडपण आणत आहेत.
अल्पबचत योजनांवर ८.७-९.२ टक्के व्याजदराच्या तरतुदीदरम्यान रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्याचा लाभ ग्राहकांना देण्यास बँका उदासीन राहिल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेऊन या महिनाअखेरीस अंतिम निर्णय घेतला जाईल.
ईपीएफचा व्याजदर ८.७५% कायम राहण्याची शक्यता
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पाच कोटींपेक्षा जास्त सदस्यांना २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्केच दराने व्याज मिळावे
By admin | Updated: December 6, 2015 22:37 IST2015-12-06T22:37:37+5:302015-12-06T22:37:37+5:30
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पाच कोटींपेक्षा जास्त सदस्यांना २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्केच दराने व्याज मिळावे
