बंगळुरू : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ)आता युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियासाठी (यूआयडीएआय) रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ज्या सदस्यांकडे आधार कार्ड नाही, अशांची नोंदणी या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
ईपीएफओकडून ४ कोटी २0 लाख पोर्टेबल युनिव्हर्सल पीएफ खाते क्रमांक देण्यात आले आहेत. या खाते क्रमांकांना आधारशी संलग्न करण्याचा संस्थेचा विचार आहे. यासाठी १२0 क्षेत्रिय कार्यालयांमार्फत मोहीम राबविली जाणार आहे. भविष्य निर्वाह निधीचे आॅनलाईन दावे निकाली काढण्याबरोबरच अन्य सेवा तात्काळ देता याव्यात, यासाठी पोर्टेबल युनिव्हर्सल क्रमांक आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. सध्या ईपीएफओच्या ४ कोटी २0 लाख सदस्यांपैकी फक्त ४२ लाख सदस्यांकडून आधार क्रमांक देण्यात आला आहे.
त्यातील २१ लाख आधार क्रमांकाची वैधता तपासण्यात आली आहे. ईपीएफओची रजिस्ट्रार म्हणून आवश्यक ती प्रक्रिया पार पडली, की यूआयडीएआयकडून ईपीएफओच्या कार्यालयात आधार नोंदणीसाठी कॅम्प लावण्यात येणार आहे.
(वृत्तसंस्था)
ईपीएफओ करणार आधार नोंदणी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ)आता युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियासाठी (यूआयडीएआय) रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
By admin | Updated: December 2, 2014 01:27 IST2014-12-02T01:27:28+5:302014-12-02T01:27:28+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ)आता युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियासाठी (यूआयडीएआय) रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
