Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफला शेअर गुंतवणुकीत फटका

ईपीएफला शेअर गुंतवणुकीत फटका

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एसबीआय निफ्टी ईटीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर फारच कमी परतावा मिळाला असल्याचे उघड झाले आहे

By admin | Updated: November 30, 2015 00:50 IST2015-11-30T00:50:23+5:302015-11-30T00:50:23+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एसबीआय निफ्टी ईटीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर फारच कमी परतावा मिळाला असल्याचे उघड झाले आहे

EPF inflows into share investments | ईपीएफला शेअर गुंतवणुकीत फटका

ईपीएफला शेअर गुंतवणुकीत फटका

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एसबीआय निफ्टी ईटीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर फारच कमी परतावा मिळाला असल्याचे उघड झाले आहे. शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करावी की नाही या चर्चेनंतर ईपीएफओने शेवटी गेल्या आॅगस्ट-आॅक्टोबरमध्ये २,३२२.१० कोटी रुपयांची गुंतवणूक ईटीएफमध्ये केली व त्यावर वार्षिक १.५२ टक्के परतावा मिळाला. स्टेट बँक आॅफ इंडियाचे दोन एक्स्चेंज-ट्रेडेड फंडांमध्ये (सेन्सेक्स इटीएफ आणि निफ्टी ईटीएफ) गुंतवणूक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफओने जवळपास ५९० कोटी रुपये सेन्सेक्स ईटीएफमध्ये व १,७३० कोटी रुपये निफ्टी ईटीएफमध्ये गुंतविले. सेन्सेक्स ईटीएफमधील गुंतवणुकीच्या तुलनेत निफ्टी ईटीएफमधील गुंतवणूक तीनपट असूनही परतावा अगदी उलट मिळाला.
सेन्सेक्स ईटीएफने वार्षिक २.९७ टक्के परतावा दिला व निफ्टी ईटीएफने तो १.०३ टक्के दिला. यामुळे अधिकारी आणि निधी व्यवस्थापक आपल्या निर्णयाच्या धोरणाचा फेरविचार करीत आहेत. अतिशय निराशाजनक परतावा पाहून कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी शेअर बाजारात गुंतवणूक करू नका अशी मागणी सुरू केली आहे. सरकारला मात्र निधीच्या गुंतवणुकीतून प्रदीर्घ काळ चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की तीन महिन्यांचा कालावधी खूपच कमी आहे.

Web Title: EPF inflows into share investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.