Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘ईपीएफ’ अदालत आता ‘निधी आपके निकट’ !

‘ईपीएफ’ अदालत आता ‘निधी आपके निकट’ !

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफ) आपल्या भविष्य निधी न्यायालयाचे (अदालत) नामकरण आता ‘निधी आपके निकट’ असे केले आहे.

By admin | Updated: June 8, 2015 23:43 IST2015-06-08T23:43:04+5:302015-06-08T23:43:04+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफ) आपल्या भविष्य निधी न्यायालयाचे (अदालत) नामकरण आता ‘निधी आपके निकट’ असे केले आहे.

'EPF' court now comes 'close to you'! | ‘ईपीएफ’ अदालत आता ‘निधी आपके निकट’ !

‘ईपीएफ’ अदालत आता ‘निधी आपके निकट’ !

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफ) आपल्या भविष्य निधी न्यायालयाचे (अदालत) नामकरण आता ‘निधी आपके निकट’ असे केले आहे. ही संघटना अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व तिच्यात लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी हे नामकरण करण्यात आले आहे.
ईपीएफओच्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्य निधी अदालत ही तक्रार निवारण यंत्रणा असली तरी बदलत्या काळानुसार अंशधारकांच्या अपेक्षा खूप बदलल्या आहेत. त्यानुसार ईपीएफओने सेवा देताना वस्तुस्थितीचा विचार करून नवे स्वरूप व यंत्रणा विकसित करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे अदालतचे नाव असे असावे की, त्यामुळे सगळ्याच अंशधारकांना सर्वोत्तम सेवा देण्याची आमची बांधिलकी प्रतिबिंबित झाली पाहिजे. संघटनेच्या व्यासपीठावर व्यापक चर्चा होऊन भविष्य निधी अदालतचे नाव बदलून ‘निधी आपके निकट’ असे करण्यात आले आहे. निधी आपके निकटची बैठक येत्या जुलैपासून दरमहा १० तारखेला होईल, असेही त्यात म्हटले आहे.

Web Title: 'EPF' court now comes 'close to you'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.