सथलांतरणाच्या निर्णयात बदल नाहीवीज दरवाढ आम्हाला त्रासदायक ठरत आहे. केंद्रात बहुमत असलेले सरकार, उद्योगांना पोषक ठरणारा अर्थसंकल्प असला, तरी वीज दरवाढीचा प्रश्न राज्य पातळीवरील आहे. ही दरवाढ कमी करण्यात राज्य सरकारकडून काहीच झालेले नाही. त्यामुळे कर्नाटकात स्थलांतरणाच्या आम्ही घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल होणार आहे. याठिकाणी जागा मिळवून स्थिरस्थावर होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्याची सुरुवात आता आम्ही केली आहे. जागेबाबत आतापर्यंत कर्नाटकचे उद्योगमंत्री प्रकाश हुक्केरी, लघु व सूक्ष्म उद्योग मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रामा रेड्डी यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्योजकांच्या मागणीनुसार अर्ज संकलनाची मुदत जुलै अखेरपर्यंत वाढविली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जागा व अन्य सुविधांबाबतचा प्रस्ताव तयार केला जाईल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. - उदय दुधाणे (अध्यक्ष, गोशिमा)...................................................................................
कर्नाटकातील स्थलांतरणावर उद्योजक ठामच... या बातमीला जोड... प्रतिक्रिया
स्थलांतरणाच्या निर्णयात बदल नाही
By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST2014-07-11T21:45:38+5:302014-07-11T21:45:38+5:30
स्थलांतरणाच्या निर्णयात बदल नाही
