Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

By admin | Updated: January 11, 2015 12:20 IST2015-01-11T12:17:02+5:302015-01-11T12:20:18+5:30

रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

The entrepreneurs are going to invest in Gujarat, Reliance, one lakh crores | उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

 

ऑनलाइन लोकमत 
गांधीनगर, दि. ११ -  मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळे देशभरात एक नवीन उत्साह आल्याचे सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तर आदित्य बिर्ला समुह, सुझूकी या ख्यातनाम उद्योग समुहांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजकांची पावले आता मोदींच्या गुजरातकडे वळत असल्याच दिसत आहे. 
गुजरातमध्ये उद्योजकांसाठी व्हायब्रंट गुजरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी झाले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली. आदित्य बिर्ला समुहाचे कुमारमंगलम बिर्ला यांनीदेखील गुजरातमध्ये सिमेंट आणि अन्य उद्योगांच्या विस्तारासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सुझूक आणि अन्य उद्योजकांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी व्हायब्रंट गुजरात ही परिषद मोदींच्या मदतीला धावून आल्याचे दिसते. 

Web Title: The entrepreneurs are going to invest in Gujarat, Reliance, one lakh crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.