Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॲट्रॉसिटीप्रकरणी निखील संखेला सक्तमजुरी

ॲट्रॉसिटीप्रकरणी निखील संखेला सक्तमजुरी

जातीवाचक शिवीगाळ : एक हजाराचा दंड

By admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:15+5:302014-10-29T22:08:15+5:30

जातीवाचक शिवीगाळ : एक हजाराचा दंड

Empowerment of the Straits Committee | ॲट्रॉसिटीप्रकरणी निखील संखेला सक्तमजुरी

ॲट्रॉसिटीप्रकरणी निखील संखेला सक्तमजुरी

तीवाचक शिवीगाळ : एक हजाराचा दंड
पालघर : जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या कुंभवली येथील राजेंद्र संखे याला पालघरचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश एम. एस. क्षीरसागर यांनी सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे. २०११ साली संखे कुटुंबियांच्या मालकीच्या घरातील भाडेकरूविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या जाधव कुटुंबियांना राजेंद्रने जातीवाचक शिवीगाळ केली होती.
बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात नर्सची नोकरी करणारी बबिता दशरथ जाधव (२५ रा. गुंदवली) या १७ मार्च २०११ला संध्याकाळी कामावरून घरी येत होती. तेव्हा कोणीतरी तिचा गळा दाबून फरफटत झुडपात नेण्याचा प्रयत्न केला. बबिताने सुटका करून घेतली. मात्र तिच्या मावश्यांनी आणि चुलत भावाने हे पाहीले व पाठलाग करून छुनूकू परमानंद प्रधान याला पकडले. तो कुंभवलीतील नैना संखे यांच्या चाळीतला भाडेकरू असल्याचे कळले. त्यामुळे सर्वजण त्याला घेऊन त्याच्या घरमालकाकडे - संखे यांच्याकडे गेले. यावेळी नैना संखे यांचा मुलगा निखील आणि जाधव कुटूंबीयांत वाद झाला. त्याचा फायदा घेत छुनूकू पळून गेला. त्याचवेळी निखील संखेने बबिताला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाणीची धमकी दिली.
या प्रकरणी पालघरचे न्यायाधीश क्षीरसागर यांनी निखीलला सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सरकारी वकिल ॲड. पी. एच. पटेल यांनी दिली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Web Title: Empowerment of the Straits Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.