Lokmat Money > बिझनेस न्यूज > रोजगार वाढणार, लवकरच १०-१५ टक्के वेतनवाढ

रोजगार वाढणार, लवकरच १०-१५ टक्के वेतनवाढ

दोन तृतियांशहून अधिक कंपन्या आणि सल्लागार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबाबत आशावादी आहेत. याशिवाय आगामी काही

By admin | Updated: February 26, 2015 00:25 IST2015-02-26T00:25:07+5:302015-02-26T00:25:07+5:30

दोन तृतियांशहून अधिक कंपन्या आणि सल्लागार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबाबत आशावादी आहेत. याशिवाय आगामी काही

Employment will increase, 10-15 percent increments soon | रोजगार वाढणार, लवकरच १०-१५ टक्के वेतनवाढ

रोजगार वाढणार, लवकरच १०-१५ टक्के वेतनवाढ

नवी दिल्ली : दोन तृतियांशहून अधिक कंपन्या आणि सल्लागार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबाबत आशावादी आहेत. याशिवाय आगामी काही महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते १५ टक्के वाढ होईल, असाही त्यांचा अंदाज आहे.
रोजगाराच्या संधीवरील सर्वेक्षणानुसार, ६९ टक्के कंपन्या व सल्लागार २०१५ च्या पहिल्या सहामाहीत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबाबत आशावादी आहेत. इन्फो एज (भारत) लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश ओबेरॉय म्हणाले की, जिथपर्यंत रोजगार संधीची निर्मिती व नियुक्तीच्या स्थितीचा प्रश्न आहे, राजकीय आणि आर्थिक आघाडीवरील स्थैर्यामुळे २०१५ वर्ष २०१४ च्या तुलनेत अधिक चांगले राहील.

Web Title: Employment will increase, 10-15 percent increments soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.