बुलडाणा : वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणाऱ्या उद्योगांच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे. राज्यात असे २ लाख ११ हजार सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग कार्यरत असून, या माध्यमातून २६ लाख ९५ हजार युवकांना रोजगार मिळाला
आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारकडून विशिष्ट प्रोत्साहन दिले जाते आहे. यासाठी शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजू व सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे़ वस्तुनिर्माण उद्योग आणि सेवा पुरविणारे उद्योग यात सूक्ष्म, लघु व मध्यम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, अन्न, गृहउद्योग, खादी ग्रामोद्योग, दुग्ध व्यवसाय, अभियांत्रिकी, कृषी, गृहनिर्माण आदी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून या तरुणांनी वेगळी ओळख निर्माण केली. (प्रतिनिधी)
स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार
वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणाऱ्या उद्योगांच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे
By admin | Updated: June 24, 2015 00:23 IST2015-06-24T00:23:36+5:302015-06-24T00:23:36+5:30
वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणाऱ्या उद्योगांच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे
