Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचार्‍यांच्या संयमाचा बांध फुटला! प्रशासनाच्या विरोधात संघर्ष समितीचा एल्गार

कर्मचार्‍यांच्या संयमाचा बांध फुटला! प्रशासनाच्या विरोधात संघर्ष समितीचा एल्गार

अकोला : सेवानिवृत्त तसेच कार्यरत मनपा कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रशासनाने जाचक अटींचा समावेश केला असून, पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दडपणामुळे दोन कर्मचार्‍यांना हृदयविकाराचे झटके आल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशासनाला बुधवारी रीतसर नोटीस दिली जाईल.

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:25+5:302014-12-02T23:30:25+5:30

अकोला : सेवानिवृत्त तसेच कार्यरत मनपा कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रशासनाने जाचक अटींचा समावेश केला असून, पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दडपणामुळे दोन कर्मचार्‍यांना हृदयविकाराचे झटके आल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशासनाला बुधवारी रीतसर नोटीस दिली जाईल.

Employee's spit of damn! Against the administration Elgar of the conflict committee | कर्मचार्‍यांच्या संयमाचा बांध फुटला! प्रशासनाच्या विरोधात संघर्ष समितीचा एल्गार

कर्मचार्‍यांच्या संयमाचा बांध फुटला! प्रशासनाच्या विरोधात संघर्ष समितीचा एल्गार

ोला : सेवानिवृत्त तसेच कार्यरत मनपा कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रशासनाने जाचक अटींचा समावेश केला असून, पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दडपणामुळे दोन कर्मचार्‍यांना हृदयविकाराचे झटके आल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशासनाला बुधवारी रीतसर नोटीस दिली जाईल.
एलबीटी, पाणीप˜ी ,मालमत्ता कर वसुली व बाजार परवाना कर वसुलीत वाढ झाल्याने किमान दिवाळीत आयुक्त डॉ. कल्याणकर वेतनाचा मुद्दा निक ाली काढतील,अशी कर्मचार्‍यांना अपेक्षा होती. झाले मात्र उलटेच, नियमानुसार कर्मचार्‍यांना जून, जुलै महिन्यात वेतनवाढ दिली नाही. फोर-जीच्या १३ कोटींमधून आठ कोटी कर्मचार्‍यांसाठी वळते केल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी वसूल केलेला पैसा आहे कोठे, असा सवाल कर्मचारी संघर्ष समितीने उपस्थित केला. या मुद्द्यावर मनपा आवारात कर्मचारी संघर्ष समितीची बैठक पार पडली. कर्मचार्‍यांना पाच महिन्यांपूर्वीचे वेतन अदा न करता, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला. याकरिता मालमत्ता कराचा भरणा केल्याची पावती व जे कर्मचारी भाड्याने राहतात, त्यांना घरमालकाकडून भाडे जमा केल्याची पावती जमा करण्याचे आदेश दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रचंड हाल होत असून, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दडपणामुळे दोन कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा मुद्दा बैठकीत समोर आला. प्रशासनाच्या मनमानीविरोधात मनपा कर्मचारी कृती संघर्ष समितीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असून, उद्या नोटीस देण्यावर एकमत झाले. बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले, अनूप खरारे, शांताराम निंधाने, अनिल बिडवे, कैलास पुंडे, विठ्ठल देवकते, विजय सारवान, विजय पारतवार, रवींद्र शिरसाट, प्रकाश घोगलिया, उमेश लखन, नंदू उजवणे, हरिभाऊ खोडे, सावन इटोले, प्रताप झांजोटे, गुरु झांजोटे, सुनील इंगळे यांसह अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना, कास्ट्राइब कर्मचारी संघटना, म्युनिसिपल मजदूर युनियन, महापालिका कर्मचारी महासंघ तसेच जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Employee's spit of damn! Against the administration Elgar of the conflict committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.