नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा वाढणार आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारावरील खर्च १ लाख कोटींच्या वर गेला असताना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तोंडावर येऊन ठेपली आहे.
चालू आर्थिक वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांवरील वेतनखर्चात ९.५६ टक्के वाढ झाली असून, हा खर्च १ लाख ६१९ कोटींपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज सहामाही आर्थिक आढाव्यात व्यक्त करण्यात आला होता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहा
टक्के वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०१५पासून लागू करण्यात
आला आहे. महागाई भत्ता ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के झाला. ४० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५०
लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा
लाभ मिळेल. २०१६-१७ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील
खर्च आणखी वाढणार असून, तो
१.१६ लाख कोटींच्या घरात
राहण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
७वा वेतन आयोग
१ जानेवारीपासून?
सातवा वेतन आयोग आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी पुढील वर्षी १ जानेवारीपासून लागू केली जाण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. यापूर्वीच्या संपुआ सरकारने फेब्रुवारी २०१४मध्ये या आयोगाची स्थापना केली होती. चालू आर्थिक वर्षात पेन्शनवरील खर्चही वाढला असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांवरील वेतनखर्चाचे अंदाजपत्रक आणखी फुगणार असून, २०१७-१८मध्ये वेतनखर्च १.२८ लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. संपुआ सरकारने गेल्या एप्रिलमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०१५पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला होता.
कर्मचाऱ्यांचा पगार केंद्राला डोईजड!
केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा वाढणार आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्रीय
By admin | Updated: September 11, 2015 05:45 IST2015-09-11T02:45:07+5:302015-09-11T05:45:35+5:30
केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा वाढणार आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्रीय
