Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-मेल व्यवहाराने पोस्टाची कर्मचारी कपात

ई-मेल व्यवहाराने पोस्टाची कर्मचारी कपात

आॅस्ट्रेलियात ई-मेलच्या वाढत्या वापरामुळे पोस्ट खात्याशी संबंधित सुमारे दोन हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

By admin | Updated: June 27, 2015 00:14 IST2015-06-27T00:14:51+5:302015-06-27T00:14:51+5:30

आॅस्ट्रेलियात ई-मेलच्या वाढत्या वापरामुळे पोस्ट खात्याशी संबंधित सुमारे दोन हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Employee deduction of e-mail transaction | ई-मेल व्यवहाराने पोस्टाची कर्मचारी कपात

ई-मेल व्यवहाराने पोस्टाची कर्मचारी कपात

सिडनी : आॅस्ट्रेलियात ई-मेलच्या वाढत्या वापरामुळे पोस्ट खात्याशी संबंधित सुमारे दोन हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आगामी तीन वर्षांत सरकार सुमारे १,९०० कर्मचारी कमी करणार आहे.
आॅस्ट्रेलियाच्या पोस्टाच्या मते, ई-मेलमुळे पारंपरिक पत्रव्यवहारात मोठी घट झाली आहे. यामुळे विभागाला मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. चालू आर्थिक वर्षात हे नुकसान ३८.७ कोटी अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांत पोस्टाचे दीड अब्जाहून अधिक डॉलरचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आॅस्ट्रेलियन पोस्टाने किती जणांना कमी केले जाईल याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
आॅस्ट्रेलियात पोस्ट विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारात १० टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे. हे नुकसान पुढे असेच सुरू राहिल्यास गेल्या ३० वर्षांत सर्वाधिक आर्थिक फटका बसलेला विभाग म्हणून पोस्टावर ठपका बसू शकतो, असा इशारा आॅस्ट्रेलियाच्या सरकारने दिला आहे.
आॅस्ट्रेलियातील पोस्ट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद फाहौर यांनी सांगितले की, पारंपरिक पत्रव्यवहारात घट होण्याची स्थिती आता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. कोणत्याही सुधारणेशिवाय आता हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.
आगामी तीन वर्षांत पोस्ट विभागात आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या काळात कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांना नवे काम शोधण्याची संधी देण्यात येईल. यासाठी १९० दशलक्ष डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या शहरी भागात सर्वाधिक आहे, असे पोस्ट अधिकाऱ्याने सांगितले.
सुधारणा कार्यक्रमाचा कोणत्याही कर्मचाऱ्याला थेट फटका बसणार नाही याची काळजी घेतली जाणार असून नव्या भूमिकेत काम करण्याची तयारी असणाऱ्यांना यात संधी मिळेल. आॅस्ट्रेलियन पोस्ट विभाग येत्या काळात दोन अति जलद टपाल सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. वेळेत टपाल पोहोचविण्यासाठी ग्राहक पैसे मोजालयाही तयार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Employee deduction of e-mail transaction