उच्चशिक्षणासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उच्च संकल्प केला असला, तरी त्यासाठी पुरेशी तरतूद केलेली नाही. बाजारातून पैसा गोळा करण्यावरच भर दिला आहे. गुणवत्ता आणि कौशल्यविकासातून अधिकाधिक रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला आहे.
शासकीय पातळीवर उच्चशिक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व बाजारातून पैसा गोळा करण्यासाठी हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे. या एजन्सीकडून देणग्या आणि सीएसआर फंड शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वापरला जाणार आहे. मात्र, ही कल्पना कितपत प्रत्यक्षात येईल, याबद्दल संभ्रमच आहे. जागतिक पातळीवरील पहिल्या १०० संस्थांमध्येही भारतातील शिक्षणसंस्था नाही. या पार्श्वभूमीवर १० सरकारी व १० खासगी शैक्षणिक संस्था जागतिक दर्जाच्या करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नव्या ६२ जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना करण्याची घोषणाही ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कौशल्यातून रोजगारावर भर
उच्चशिक्षणासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उच्च संकल्प केला असला, तरी त्यासाठी पुरेशी तरतूद केलेली नाही. बाजारातून पैसा गोळा करण्यावरच भर दिला आहे
By admin | Updated: March 1, 2016 03:26 IST2016-03-01T03:26:20+5:302016-03-01T03:26:20+5:30
उच्चशिक्षणासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उच्च संकल्प केला असला, तरी त्यासाठी पुरेशी तरतूद केलेली नाही. बाजारातून पैसा गोळा करण्यावरच भर दिला आहे
