Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वीज उत्पादनात वर्षभरात २२,५६६ मेगावॅटची वाढ

वीज उत्पादनात वर्षभरात २२,५६६ मेगावॅटची वाढ

गेल्या एक वर्षात वीज उत्पादनात आतापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ झाल्यामुळे देशात वीजटंचाई कमी होऊन ३.६ टक्के एवढ्या नीचांकावर आली आहे,

By admin | Updated: May 27, 2015 23:39 IST2015-05-27T23:39:30+5:302015-05-27T23:39:30+5:30

गेल्या एक वर्षात वीज उत्पादनात आतापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ झाल्यामुळे देशात वीजटंचाई कमी होऊन ३.६ टक्के एवढ्या नीचांकावर आली आहे,

Electricity generation increased 22,566 MW in a year | वीज उत्पादनात वर्षभरात २२,५६६ मेगावॅटची वाढ

वीज उत्पादनात वर्षभरात २२,५६६ मेगावॅटची वाढ

नवी दिल्ली : गेल्या एक वर्षात वीज उत्पादनात आतापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ झाल्यामुळे देशात वीजटंचाई कमी होऊन ३.६ टक्के एवढ्या नीचांकावर आली आहे, असे वीज आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोयल यांनी नरेंद्र मोदी सरकारने वीज आणि कोळसा क्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘गेल्या एक वर्षात २२,५६६ मेगावॅट वीज क्षमता जोडली गेली आहे.’ याशिवाय पारेषण लाईन क्षमतेमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक २२,१०० सर्किट किलोमीटरची आणि सब स्टेशन क्षमतेत आतापर्यंतची सर्वात जास्त ६६,५५४ मेगावॅट वाढ झाली आहे. गोयल यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने ३.२ कोटी टन एवढे विक्रमी कोळसा उत्पादन केले आहे व २०२० पर्यंत उत्पादन क्षमता १० कोटी टन गाठता येईल का याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.
सरकारच्या आगामी योजनांमध्ये २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता पाचपटींनी जास्त वाढवून १,७५,००० मेगावॅटपर्यंत नेणे. २० हजार मेगावॅटची पाच सयंत्र स्थापन करणे, पडून असलेल्या गॅस आधारित सयंत्रांना सुरू करून जास्त मागणी असलेल्या वेळी वीजपुरवठा करणे, सब ट्रान्समिशन आणि वितरणात १.०९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणणे आणि चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांच्या नव्या पारेषण प्रकल्पांसाठी कंत्राट देण्याचा समावेश आहे.

४जवळपास १००-१०० मेगावॅटच्या २५ सौरपार्कांच्या स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य दिले जाईल आणि ३८ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हरित ऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली जाईल म्हणजे त्यातून अक्षय ऊर्जेचे पारेषण केले जाऊ शकेल, असेही पीयूष गोयल म्हणाले.

Web Title: Electricity generation increased 22,566 MW in a year