Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाण्याचे टॅँकर, चारा डेपो सुरू करावेत एकमुखी ठराव : सांगोला तालुका टंचाई आढावा बैठक

पाण्याचे टॅँकर, चारा डेपो सुरू करावेत एकमुखी ठराव : सांगोला तालुका टंचाई आढावा बैठक

सांगोला : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाला असून, खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. अशा उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तत्काळ पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा डेपो अगर छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे यांनी आढावा बैठकीत केला.

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:31+5:302015-08-31T21:30:31+5:30

सांगोला : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाला असून, खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. अशा उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तत्काळ पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा डेपो अगर छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे यांनी आढावा बैठकीत केला.

Eco-friendly resolution to start water tanker, fodder depot: Sangola taluka scarcity review meeting | पाण्याचे टॅँकर, चारा डेपो सुरू करावेत एकमुखी ठराव : सांगोला तालुका टंचाई आढावा बैठक

पाण्याचे टॅँकर, चारा डेपो सुरू करावेत एकमुखी ठराव : सांगोला तालुका टंचाई आढावा बैठक

ंगोला : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाला असून, खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. अशा उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तत्काळ पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा डेपो अगर छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे यांनी आढावा बैठकीत केला.
या बैठकीला आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे, जि. प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, सभापती सुरेखा सूर्यगण, उपसभापती सुनील चौगुले, जि. प. सदस्या राणी दिघे, अशोक शिंदे, प्रांताधिकारी एम. बी. बोरकर, तहसीलदार र्शीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, सहा.अभियंता संतोष सोनवणे, नानासो रुपनर, लेबर फेडरेशन अध्यक्ष बाबासो करांडे, पं.स.सदस्य संभाजी आलदर, बिरा गेजगे, पांडुरंग पांढरे, नंदकुमार शिंदे, चेतनसिंह केदार-सावंत, बाळासो काटकर, मारुती बनकर, गिरीश गंगथडे, गजेंद्र कोळेकर, चंद्रकांत शिंदे, विठ्ठलराव शिंदे उपस्थित होते.
गतवर्षी तालुक्यात 515 मि.मी.सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदा पावसाळा संपत आला तरी फक्त 56 मि. मी. इतका पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. महत्त्वाकांक्षी टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडून तलाव, छोटे-मोठे बंधारे भरुन मिळावेत, प्रत्येक गावात रस्त्याची कामे हाती घ्यावीत, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन दिल्यास या कामातील रस्त्याचे तंटे मिटण्यास मदत होईल, ग्रामपंचायत स्तरावर आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतून शेतकर्‍यांनी शेततळी योजनांचा लाभ घ्यावा. तालुक्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांनी जनतेत समन्वय राखून दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी प्रय} करावेत, अशा सूचनाही आमदार देशमुख व आमदार साळुंखे यांनी केल्या.
टंचाईवर सूचना
तालुक्यात सद्यस्थितीला 1364 पैकी 579 हातपंप कायमस्वरुपी चालू असून, 676 हंगामी तर 109 कायमस्वरुपी बंद आहेत. हातपंप कार्यान्वित करणे, शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून 82 पैकी 42 गावांना दैनंदिन तर 34 गावांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. आठ दिवसांत ग्रामपंचायतीने थकीत 50 टक्के पाणीप?ीची बिले अदा करावीत, अशा सूचना करण्यात आल्या.

Web Title: Eco-friendly resolution to start water tanker, fodder depot: Sangola taluka scarcity review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.