Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकर रिटर्न भरणे वेतनदारांसाठी सोपे

आयकर रिटर्न भरणे वेतनदारांसाठी सोपे

वेतन घेणाऱ्या वर्गाला आयकर रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी क्राऊड फंडिंग कंपनीने ‘हॅलो टॅक्स’ नावाचे नवे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने

By admin | Updated: August 28, 2015 03:27 IST2015-08-28T03:27:51+5:302015-08-28T03:27:51+5:30

वेतन घेणाऱ्या वर्गाला आयकर रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी क्राऊड फंडिंग कंपनीने ‘हॅलो टॅक्स’ नावाचे नवे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने

Easy to pay income tax return salaries | आयकर रिटर्न भरणे वेतनदारांसाठी सोपे

आयकर रिटर्न भरणे वेतनदारांसाठी सोपे

नवी दिल्ली : वेतन घेणाऱ्या वर्गाला आयकर रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी क्राऊड फंडिंग कंपनीने ‘हॅलो टॅक्स’ नावाचे नवे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने काही मिनिटांत रिटर्न दाखल करता येईल.
क्राऊड फंडिंग कंपनी ‘एंजल पैसा’ने निवेदनात म्हटले आहे की, हे अ‍ॅप अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी प्ले स्टोअरमध्ये, तर आयफोन वापरणाऱ्यांसाठी अ‍ॅपल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.ज्यांना केवळ वेतनाचे उत्पन्न आहे अशा आयकरदात्यांना या अ‍ॅपद्वारे केवळ तीन टप्प्यांत रिटर्न दाखल करता येईल. यामुळे रिटर्न भरण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल. कार्यक्षमता वाढून रिटर्न भरण्याची प्रक्रियाही वेगाने होईल. शिवाय ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख आहे.

Web Title: Easy to pay income tax return salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.