नवी दिल्ली : आयकर विभागाने २0१६-१७ या आर्थिक वर्षात आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही श्रेणींत ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आयटीआर-२, आयटीआर-३ या श्रेणीतील व्यक्ती आणि संस्थांना आता ई-फायलिंग करता येईल. आयटीआर-२ मध्ये व्यवसाय आणि पेशातून उत्पन्न मिळत नाही, अशा व्यक्ती तसेच हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यक्तींचा समावेश होतो. ज्यांच्याकडे विदेशी संपत्ती नाही, अशांचा समावेशही याच श्रेणीत होतो. आयटीआर-३ मध्ये अशा व्यक्ती आणि संस्था येतात ज्या संस्थांत भागीदार आहेत.
मात्र कोणत्याही प्रकारच्या प्रोप्रायटरशिपतहत व्यवसायात नाहीत. आयकर विभागाने आयटीआर-१ (सहज) आणि आयटीआर-४एस (सुगम) हे फॉर्म २ एप्रिलपासून सुरू केले आहेत. हे फॉर्म विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहेत, असे आयकर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
आणखी काही श्रेणीत ई-आयटीआरची सोय
आयकर विभागाने २0१६-१७ या आर्थिक वर्षात आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही श्रेणींत ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
By admin | Updated: April 8, 2016 03:11 IST2016-04-08T03:11:59+5:302016-04-08T03:11:59+5:30
आयकर विभागाने २0१६-१७ या आर्थिक वर्षात आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही श्रेणींत ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
