नवी दिल्ली : विदेशात ठेवण्यात आलेला बेकायदा पैसा, संपत्तीचा तपशील देण्यासाठी आयकर विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) ई-फायलिंग लिंक सुरू केली आहे.
आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ई- फायलिंग पोर्टल ‘एचटीटीपीएस : इन्कमटॅक्सइंडियाफायलिंग डॉट जीओव्ही डॉट इन डॉट’ वर ही लिंक उपलब्ध आहे. विदेशातील बेकायदा संपत्ती, पैसा जाहीर करण्यासाठी फॉर्म ६ चा वापर केला जाऊ शकतो. कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेने आॅनलाईन पाठविलेल्या माहितीची सत्यता पडताळून बघण्यासाठी ‘डिजिटल स्वाक्षरी’ची गरज आहे. हातांनी लिहिलेली कागदपत्रे किंवा प्रकाशित दस्तावेजांवर स्वाक्षरी केल्यानंतर ती जशी प्रमाणित ठरतात त्याचप्रमाणे डिजिटल स्वाक्षरी इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे पाठविलेली माहिती असते. शिवाय ज्यांना प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करायची आहेत त्यांना ते सादर करता येतील.
काळा पैसा जाहीर करण्यासाठी ई-फायलिंग लिंक
विदेशात ठेवण्यात आलेला बेकायदा पैसा, संपत्तीचा तपशील देण्यासाठी आयकर विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) ई-फायलिंग
By admin | Updated: July 21, 2015 22:50 IST2015-07-21T22:50:18+5:302015-07-21T22:50:36+5:30
विदेशात ठेवण्यात आलेला बेकायदा पैसा, संपत्तीचा तपशील देण्यासाठी आयकर विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) ई-फायलिंग
