मुंबई : देशातील प्रत्येक गावात असलेला प्रत्यक्ष संपर्क या भांडवलाच्या बळावर भारतीय टपाल खात्याने आता ई-कॉमर्सच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ई-कॉमर्समुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार जरी इंटरनेटवरून होणार असला, तरी एक लाख ५५ हजार ३३३ पोस्ट कार्यालयांचे जाळे आणि वस्तंूची प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्यासाठी विश्वसनीय पोस्टमन यंत्रणेमुळे या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना टपाल खाते मोठी टक्कर देऊ शकतील.
टपाल सेवा बोर्डाचे सदस्य जॉन सॅम्युअल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चून पोस्टाच्या संगणकीकरणाचे काम सुरू आहे. ई-कॉमर्सचे व्यवहार करणारे पोर्टल हा त्याच मोहिमेचा भाग आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून सहा महिन्यांच्या कालावधीत हे पोर्टल लाँच करण्यात येईल.
अमेझॉन, फ्लिपकार्ट या सध्याच्या लोकप्रिय ई-कॉमर्स पोर्टलच्या धर्तीवरच याची मांडणी करण्यात आली आहे. मात्र, या कंपन्यांच्याही एक पाऊल पुढे जात या कंपन्यांना तगडे आव्हान देण्यासाठी आपल्या नेटवर्कचा सर्वतोपरी वापर करण्याची मोठी योजना विभागाने तयार केली आहे. ग्राहकांना उत्तम व दर्जेदार माल अधिक स्वस्तात मिळावा, याकरिता व्यापाऱ्यांसोबत थेट संबंधित उद्योगातील वितरण बोर्ड, फेडरेशन यांच्याशी करारबद्ध होण्याची नीती आखली आहे. खरेदीदारच नव्हे, तर व्यापाऱ्यांना देखील या पोर्टलच्या माध्यमातून सुलभपणे व्यवहार करता यावेत अथवा आपल्या मालाच्या उपलब्धीची माहिती व्हावी, याकरिता अधिक सुलभ प्रक्रिया करण्याचे संकेत दिले आहेत.
ई-कॉमर्सच्या उद्योगात आता पोस्टही उतरणार!
देशातील प्रत्येक गावात असलेला प्रत्यक्ष संपर्क या भांडवलाच्या बळावर भारतीय टपाल खात्याने आता ई-कॉमर्सच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू केली आहे
By admin | Updated: January 31, 2015 02:15 IST2015-01-31T02:15:35+5:302015-01-31T02:15:35+5:30
देशातील प्रत्येक गावात असलेला प्रत्यक्ष संपर्क या भांडवलाच्या बळावर भारतीय टपाल खात्याने आता ई-कॉमर्सच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू केली आहे
