कोलकाता : दार्जिलिंगमधील राजकीय अशांततेमुळे भारताच्या चहा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा मानक संस्था इन्व्हेस्टमेंट अँड इन्फर्मेशन क्रेडिट रेटिंग एजन्सीने (इक्रा) दिला आहे. दार्जिलिंगमधील आंदोलनामुळे तेथील चहाच्या ८७ इस्टेट पूर्णपणे बंद आहेत. तणावामुळे चहाच्या मळ्यांमध्ये कामगारांची टंचाई भासत आहेत, तर दुसरीकडे चहावर प्रक्रिया करणारे उद्योगही गेल्या काही दिवसांपासून बंदच आहेत.
इक्राने प्रसिद्धी दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, दार्जिलिंगमध्ये सध्या राजकीय अशांतता व हिंसाचार सुरू आहे. याचा परिणाम म्हणून या भागांतील चहाच्या मळ्यातील सर्व प्रकारचे कामकाज बंद पडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चहाचे उत्पादन सुरू असतानाच्या काळात हा प्रकार घडला आहे. दार्जिलिंगमधील हा चहा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत उच्च दर्जाचा आहे. हा चहा पूर्णत: निर्यात होतो. नेमक्या या चहाच्या उत्पादनाच्या काळातच चहा उद्योगाचे कामकाज ठप्प झाल्याने निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होणे अटळ आहे.
इक्राने म्हटले की, उत्पादन ठप्प झाल्यामुळे दार्जिलिंगमधील चहा उद्योगास सुमारे १00 ते १५0 कोटी रुपयांचा फटका बसेल, असा प्राथमिक अंदाज आहे. हा राजकीय तणाव लांबल्यास आणि हिंसाचार सुरूच राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी मोठा होईल. सूत्रांनी सांगितले की, दार्जिलिंगमध्ये चहा उत्पादनाचे वर्षभरात पाच टप्पे होतात. यातील दुसरा टप्पा मे महिन्याच्या शेवटी अथवा जूनच्या प्रारंभी सुरू होतो. जुलैअखेरपर्यंत तो चालतो.
या टप्प्यात अत्यंत उच्च दर्जाच्या चहाचे उत्पादन होते. त्याला विदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे या टप्प्यातील बहुतांश चहा विदेशात निर्यात होतो. (वृत्तसंस्था)
देशांतर्गत पुरवठा सुरळीत
दार्जिलिंगमध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण चहा उत्पादनापैकी २0 ते २५ टक्के उत्पादन दुसऱ्या टप्प्यात होते. या टप्प्यातील महसुलाचे प्रमाण मात्र तुलनेने कितीतरी अधिक असते. कारण हा चहा सर्वाधिक उच्च दर्जाचा असतो. या टप्प्यातील चहा उत्पादनातील अडथळ्यामुळे होणारे नुकसानही अधिकच असेल, असे सूत्रांनी सांगितले. या टप्प्यातील नुकसानीचा देशांतर्गत चहाच्या मागणी आणि पुरवठ्यावर मात्र कोणताही परिणाम होणार नाही. कारण या काळात सध्या देशांतर्गत मागणी फारशी मजबूत नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
उत्पादन ठप्प झाल्यामुळे दार्जिलिंगमधील चहा उद्योगास सुमारे
100-150
कोटी रुपयांचा फटका बसेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
दार्जिलिंगमधील तणावामुळे चहा निर्यातीवर विपरीत परिणाम
दार्जिलिंगमधील राजकीय अशांततेमुळे भारताच्या चहा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा मानक संस्था इन्व्हेस्टमेंट अँड इन्फर्मेशन क्रेडिट रेटिंग एजन्सीने (इक्रा) दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 01:00 IST2017-07-07T01:00:22+5:302017-07-07T01:00:22+5:30
दार्जिलिंगमधील राजकीय अशांततेमुळे भारताच्या चहा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा मानक संस्था इन्व्हेस्टमेंट अँड इन्फर्मेशन क्रेडिट रेटिंग एजन्सीने (इक्रा) दिला
