Lokmat Money > बिझनेस न्यूज > हेतुत: कर बुडवणाऱ्या ३१ जणांची नावे जाहीर

हेतुत: कर बुडवणाऱ्या ३१ जणांची नावे जाहीर

करबुडवेगिरी करणाऱ्या ३१ बड्या असामींची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करीत आयकर विभागाने धडक मोहीम राबविली आहे. र

By admin | Updated: April 27, 2015 01:12 IST2015-04-27T01:06:10+5:302015-04-27T01:12:19+5:30

करबुडवेगिरी करणाऱ्या ३१ बड्या असामींची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करीत आयकर विभागाने धडक मोहीम राबविली आहे. र

Due to the tax evasion, 31 names of taxpayers are announced | हेतुत: कर बुडवणाऱ्या ३१ जणांची नावे जाहीर

हेतुत: कर बुडवणाऱ्या ३१ जणांची नावे जाहीर

नवी दिल्ली : करबुडवेगिरी करणाऱ्या ३१ बड्या असामींची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करीत आयकर विभागाने धडक मोहीम राबविली आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या या धनाढ्यांनी १५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा कर बुडविला आहे.
आयकर बुडविणारे हे लोक सापडू शकलेले नाहीत किंवा त्यांच्या नावावर पुरेशी संपत्ती नसल्यामुळे करवसुली थकलेली आहे. आयकर विभागाने त्यांचा अखेरचा पत्ता आणि आर्थिक तपशील नावानिशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केला. नावे प्रसिद्ध केल्याने होणाऱ्या बदनामीमुळे दडपण येऊन ही मंडळी कर चुकता करतील.
सर्वसामान्यांना त्यांची नावे कळली तर ते त्यांचा ठावठिकाणा कळविण्यास समोर येतील या उद्देशाने आयकर विभागाने हे पाऊल उचलले. कायद्याचे उल्लंघन करीत कर बुडवणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तीबाबत लोक जागरूक व्हावेत यासाठी ही नावे यापूर्वी आयकर विभागाच्या वेबसाईटवरही टाकण्यात आली होती,असे एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Due to the tax evasion, 31 names of taxpayers are announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.