नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्याने भारताला खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि सरकारला वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे स्टँडर्ड अँड पुअर्सच्या एका अहवालात म्हटले आहे.
सकल घरेलू उत्पादनातील वृद्धीचा विचार करता भारताची स्थिती चांगली आहे; पण २०१६ या वर्षाचा विचार करता भारताच्या धोरणात्मक बाबींची परीक्षा होणार आहे, असेही हा अहवाल म्हणतो.
अहवालात पुढे म्हटले आहे
की, खनिज तेलाचे भाव कमी असल्याने भारताला शिलकी राहिलेला पैसा इतर क्षेत्रात
खर्चता येईल आणि वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासही मदत होईल. जागतिक मागणी घटल्याने निर्यातदारांना फटकाबसेल. मात्र भारत सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून योग्य धोरण स्वीकारले आहे.
तेल दर घसरल्याने तूट नियंत्रणात राहणार
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्याने भारताला खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि सरकारला वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे स्टँडर्ड अँड पुअर्सच्या एका अहवालात म्हटले आहे.
By admin | Updated: March 17, 2016 01:29 IST2016-03-17T01:29:24+5:302016-03-17T01:29:24+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्याने भारताला खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि सरकारला वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे स्टँडर्ड अँड पुअर्सच्या एका अहवालात म्हटले आहे.