मुंबई : ई-रिटर्न पद्धतीने प्राप्तिकराचे विवरण भरताना त्यात अपुरी वैयक्तिक माहिती दिल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडे तब्बल १६ लाख करदात्यांचा परतावा पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे. १६ लाख करदात्यांच्या परताव्याच्या एकत्रित रकमेचा नेमका आकडा समजू शकला नसला तरी ती अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिटर्न पद्धतीने ज्या करदात्यांनी विवरण भरले, ते भरताना त्यात आवश्यक अशी किमान माहिती जरी त्यांनी भरली असली तरी, सर्व किंवा करदात्याची ओळख पडताळण्यासाठी आवश्यक अशी माहिती न भरल्याची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. सध्या जो १६ लाख करदात्यांचा आकडा पुढे आला आहे, तो देखील अशाच पद्धतीने अपुऱ्या माहितीच्या प्रकरणातून पुढे आला आहे. या ठिकाणी तर प्रत्यक्ष रिफंड संबंधित करदात्याच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते, मात्र, त्याकरिता आवश्यक माहिती न मिळाल्याने परताव्याची रक्कम पडून आहे.
वास्तविक ई-रिटर्न पद्धतीने विवरण भरल्यानंतर त्याची छाननी तातडीने होते. तसेच, करदात्यालाही जर काही रिफंडचे दायित्व असेल तर ते विवरण भरल्यानंतर आणि त्याची छाननी झाल्यानंतर किमान तीन महिन्याच्या कालावधीत ती थेट करदात्याच्या खात्यात थेट जमा होते. गेल्या तीन वर्षापूर्वीपर्यंत वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांच्यावरील करदात्यांकरिता ई-रिटर्न पद्धतीने कर भरणा करणे अनिवार्य होते. मात्र, २०१३ मध्ये यात बदल करून ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे, त्यांनाही ई-रिटर्न सक्तीचे करण्यात आले. परिणामी, आजवर जे २० टक्के कर आकारणीच्या श्रेणीतील होते असे सुमारे पावणे दोन कोटी लोक एकाचवेळी ई-रिटर्न पद्धतीत समाविष्ट झाले. त्यातून रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी अथवा अपुऱ्या माहितीमुळे रिफंड पडून असण्याचा आकडा वाढल्याचे विश्लेषण विभागातील अधिकाऱ्यांनी केले.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत किमान तीन कोटी लोकांना परतावा देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
४ज्या करदात्यांना रिफंड मिळणे अपेक्षित आहे, मात्र अद्याप तो मिळालेला नाही, अशा करदात्यांनी प्राप्किर विभागाच्या वेबसाईटवर लॉग-इन करावे.
४‘माय अकाऊंट’ नावाच्या सेक्शनवर क्लिक करावे.
४या सेक्शनमध्ये आवश्यक माहिती भरून, आपली पूर्ण माहिती दिसेल अशा ठिकाणी जाऊन जिथे माहिती भरायची राहून गेली आहे ती भरावी.
४माहिती अपडेट करून सेव्ह या पर्यायावर क्लिक करावे.
४तसे झाल्यानंतर आपोआप ही अपडेट माहिती प्राप्तिकरला समजेल आणि तुम्हाला रखडलेला रिफंड मिळणे सुलभ होईल.
करदात्यांचे ‘रिफंड’ दाव्यांअभावी पडून
ई-रिटर्न पद्धतीने प्राप्तिकराचे विवरण भरताना त्यात अपुरी वैयक्तिक माहिती दिल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडे तब्बल १६ लाख करदात्यांचा परतावा पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.
By admin | Updated: March 25, 2015 23:55 IST2015-03-25T23:55:05+5:302015-03-25T23:55:05+5:30
ई-रिटर्न पद्धतीने प्राप्तिकराचे विवरण भरताना त्यात अपुरी वैयक्तिक माहिती दिल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडे तब्बल १६ लाख करदात्यांचा परतावा पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.
