दोहा : तेल उत्पादन घटविण्याचा करार करण्यासाठी ‘ओपेक’मध्ये असलेली आणि ‘ओपेक’मध्ये नसलेल्या राष्ट्रांची रविवारी झालेली बैठक अंतिम क्षणी रुळावरून घसरली. ही बैठक सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील मतभेदांचा बळी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीत सौदी अरेबियाचे पेट्रोलियममंत्री अली अल नायमी सहभागी झाले. मात्र, पंचतारांकित हॉटेलमध्ये जमलेल्या पत्रकारांना ते न भेटताच निघून गेले. खनिज तेलाच्या घसरत्या किमती रोखण्यासाठी उत्पादन घटविणे आवश्यक आहे. असा तेल उत्पादन घटविण्याचा करार व्हावा. यासाठी कतारचे अमील शेख तमीम बिन हमद अल थानी प्रयत्नशील आहेत. या दृष्टीनेच रविवारी त्यांनी तेलमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत इराण सहभागी झालाच नाही.
तेल उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांत सौदी अरेबिया आणि इराण यांचा समावेश आहे. इराण हा सौदीचा प्रतिस्पर्धी समजला जातो. त्यामुळे या बैठकीपासून इराणने दूर राहावे, अशी भूमिका प्रारंभी इराणने घेतली होती; पण नंतर मात्र भूमिका बदलत ‘ओपेक’च्या सर्व सदस्य देशांनी सहभागी झाले पाहिजे, असे सौदीतर्फे सांगण्यात आले.
तेल उत्पादक प्रमुख देशांत रशिया आणि अमेरिका यांचाही समावेश आहे. बैठकीला रशिया उपस्थित राहिला. मात्र, अमेरिका अनुपस्थित राहिला.
कतारचे ऊर्जा आणि उद्योगमंत्री मोहंमद बिन सालेह अल अदा म्हणाले की, ‘या बैठकीत १५ तेल उत्पादक राष्ट्रे सहभागी झाली. जागतिक तेल उत्पादनात या देशांचा वाटा ७३ टक्के आहे. तेल उत्पादनाची मर्यादा निश्चित करण्यात आल्यास तेलाची घसरण थांबेल.’ ‘ओपेक’ आणि ‘नॉन ओपेक’ देशांत गेल्या १५ वर्षांत प्रथमच तेलाचे उत्पादन घटविण्यासाठी बोलाविण्यात आलेली बैठक अयशस्वी ठरली. त्याचा चुकीचा संदेश जागतिक स्तरावर गेला आहे.
इराणसह तेल उत्पादक अन्य मोठ्या राष्ट्रांनी उत्पादक घटविले तरच आपणही उत्पादन घटवू, असे सौदी अरेबियाचे डेप्युटी क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी जाहीर केले आहे. २०१४ च्या उन्हाळ्यापासून तेलाच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. त्यावळी कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल होते. (वृत्तसंस्था)
उत्पादन घटविणार नाही
सौदी अरेबियाने इराणविरुद्ध कठोर धोरण अवलंबिले आहे. तेल उत्पादन घटविण्यास नकार देणारे ‘ओपेक’मधील इराण हे एकमेव सदस्य राष्ट्र आहे.
गेल्या जानेवारीतच इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले. आता आपल्याला बाजारात आपला ‘वाटा’ परत मिळवावयाचा आहे. त्यामुळे आपण तेल उत्पादन घटविणार नाही, असे इराणने जाहीर केले आहे.
तेल उत्पादन घटविण्याबाबत कोंडी
तेल उत्पादन घटविण्याचा करार करण्यासाठी ‘ओपेक’मध्ये असलेली आणि ‘ओपेक’मध्ये नसलेल्या राष्ट्रांची रविवारी झालेली बैठक अंतिम क्षणी रुळावरून घसरली. ही बैठक सौदी अरेबिया
By admin | Updated: April 18, 2016 03:19 IST2016-04-18T03:19:20+5:302016-04-18T03:19:20+5:30
तेल उत्पादन घटविण्याचा करार करण्यासाठी ‘ओपेक’मध्ये असलेली आणि ‘ओपेक’मध्ये नसलेल्या राष्ट्रांची रविवारी झालेली बैठक अंतिम क्षणी रुळावरून घसरली. ही बैठक सौदी अरेबिया
