Lokmat Money > बिझनेस न्यूज > पावसाअभावी रखडली वृक्षलागवड

पावसाअभावी रखडली वृक्षलागवड

पुणे : पावसाळा सुरू झाला की सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडही सुरूवात केली जाते. यंदा मात्र, पाऊस लांबल्याने वृक्षलागवडही रखडली आहे. पावसाळ्यात राज्यात सुमारे ५० लाख वृक्ष लागवड करण्याचे प्रस्तावित असताना अद्याप हजार झाडांचीही लागवड झालेली नाही.

By admin | Updated: July 1, 2014 22:08 IST2014-07-01T22:08:55+5:302014-07-01T22:08:55+5:30

पुणे : पावसाळा सुरू झाला की सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडही सुरूवात केली जाते. यंदा मात्र, पाऊस लांबल्याने वृक्षलागवडही रखडली आहे. पावसाळ्यात राज्यात सुमारे ५० लाख वृक्ष लागवड करण्याचे प्रस्तावित असताना अद्याप हजार झाडांचीही लागवड झालेली नाही.

Due to lack of rain | पावसाअभावी रखडली वृक्षलागवड

पावसाअभावी रखडली वृक्षलागवड

णे : पावसाळा सुरू झाला की सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडही सुरूवात केली जाते. यंदा मात्र, पाऊस लांबल्याने वृक्षलागवडही रखडली आहे. पावसाळ्यात राज्यात सुमारे ५० लाख वृक्ष लागवड करण्याचे प्रस्तावित असताना अद्याप हजार झाडांचीही लागवड झालेली नाही.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात दरवर्षी इंधन, चारा, औषधी वृक्षांसह फळझाडे व सावलीसाठीच्या वृक्षांची लागवड केली जाते. यावर्षी मात्र, जुलै महिना उजाडला तरी राज्याचा काही भाग वगळता कुठेही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे वृक्ष लागवडही रखडली आहे.
याविषयी सामाजिक वनीकरण विभागाचे उपायुक्त चंद्रकांत तांबे म्हणाले, वृक्ष लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी सर्व तयारी केव्हाच पूर्ण झालेली आहेे. यंदा प्रथमच वृक्ष लागवडीसाठी यंत्राचा वापर करण्याची परवानगी मिळाल्याने वेळेआधीच खड्डेही तयार झाले आहेत. रोपवाटिकांमध्ये रोपे तयार आहेत. यावर्षी विभागामार्फत सुमारे ५० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच इतर संस्था, व्यक्तींमार्फत सुमारे १ कोटी २५ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. चांगला पाऊस सुरू होणार नाही, तोपर्यंत वृक्ष लागवड करता येणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.