ख्डी : खर्डी महावितरण कंपनीच्या अकार्यक्षम कामाचा प्रत्यय सध्या विभागातील अनेक गावांतील वीज ग्राहकांना येत आहे. विजेच्या लपंडावामुळे येथील नागरिक हैराण झाले असून त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीज नसल्याने त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. अनेक तक्रारी करूनही वेळेवर त्यांची सोडवणूक झालेली नाही़खर्डी महावितरणअंतर्गत विभागातील एकूण ६० गावपाडे येत असल्याने वीजसेवेचा ताण फार मोठा आहे. त्यातच खर्डी कार्यालयात एकूण १० कर्मचार्यांपैकी फक्त चार कर्मचारी कार्यरत आहेत. १० पैकी दोन जण निवृत्त झाले तर अन्य चार जणांची बदली दुसरीकडे झाली आहे. त्यामुळे येथे लाइनमन, एक लाइन हेल्पर व चार असिस्टंट लाइनमन ही पदे रिक्त आहेत.चार कर्मचारी घेऊन संपूर्ण विभागामध्ये काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे लेखी मागणीपत्र दिले असून लवकरच ती भरली जातील, अशी माहिती महावितरणच्या खर्डी शाखेचे कनिष्ठ अभियंता बाबा नागरे यांनी लोकमतला दिली.(वार्ताहर)
अपुर्या कर्मचार्यांमुळे खर्डीत वीजसमस्या वाढल्या
खर्डी : खर्डी महावितरण कंपनीच्या अकार्यक्षम कामाचा प्रत्यय सध्या विभागातील अनेक गावांतील वीज ग्राहकांना येत आहे. विजेच्या लपंडावामुळे येथील नागरिक हैराण झाले असून त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीज नसल्याने त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. अनेक तक्रारी करूनही वेळेवर त्यांची सोडवणूक झालेली नाही़
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:21+5:302014-08-27T21:30:21+5:30