नवी दिल्ली : परदेशी बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव मागणीअभावी ९० रुपयांनी घसरून २६,७६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही २०० रुपयांनी कोसळून ३६,५०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.
व्यापा-यांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांनी उच्च पातळीवर घटविलेली मागणी, तसेच जागतिक बाजारात कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भावावर दबाव राहिला.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव ०.१९ टक्क्यांनी घटून ११८६.३० प्रतिऔंस व चांदीचा भावही १.६२ टक्क्यांनी कमी होऊन १६.०६ डॉलर प्रतिऔंसवर आला.
तयार चांदीचा भावही २०० रुपयांनी कमी होऊन ३६,५०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १२५ रुपयांनी स्वस्त होऊन ३६,१५५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मर्यादित व्यवहारामुळे खरेदीसाठी ६०,००० रुपये व विक्रीसाठी ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीची मागणी घटल्याने भाव खाली
व्यापा-यांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांनी उच्च पातळीवर घटविलेली मागणी, तसेच जागतिक बाजारात कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भावावर दबाव राहिला.
By admin | Updated: November 18, 2014 00:02 IST2014-11-18T00:02:57+5:302014-11-18T00:02:57+5:30
व्यापा-यांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांनी उच्च पातळीवर घटविलेली मागणी, तसेच जागतिक बाजारात कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भावावर दबाव राहिला.