>नवी दिल्ली : सलग तीन सत्रंतील वाढीनंतर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 16क् रुपयांनी कमी होऊन 28,625 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीचा या मौल्यवान धातूवर परिणाम झाला. चांदीचा भावही खरेदीच्या दबावामुळे 1क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 44,7क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर राजधानीच्या बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव घसरले. घसरणीचा बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाल्याने मागणीत घट झाली.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.3 टक्क्यांनी कमी होऊन 1,313.98 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही क्.3 टक्क्यांनी घटून 2क्.82 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
दिल्ली बाजारातच 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 16क् रुपयांनी घसरून अनुक्रमे 28,65क् आणि 28,425 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. गेल्या तीन सत्रंत यात 765 रुपयांची वाढ नोंदली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)