नवी दिल्ली : सुस्त मागणी आणि पुरवठ्यात झालेली वाढ यामुळे राजधानी दिल्लीतील ठोक बाजारात निवडक डाळींचे भाव क्विंटलमागे १00 रुपयांनी उतरला.
डाळींचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा परिणाम म्हणून ठोक बाजारात डाळी उतरल्या असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. सरकारने नाफेड, एसएफएसी आणि एफसीआय यांना चालू हंगामात डाळी खरेदी करण्यासाठी ९0 कोटी रुपये अदा केले आहेत. राजधानी दिल्लीत तूर डाळीचा भाव १00 रुपयांनी उतरून ११,२00 ते १४,९00 रुपये क्विंटल झाला. उडीद डाळीचा भावही १00 रुपयांनी उतरून ९,३00 ते १0,३00 रुपये क्विंटल झाला. मूग डाळ ५0 रुपयांनी उतरून ७,0५0 ते ८,0५0 रुपये क्विंटल झाली. चणा डाळही ५0 रुपयांनी उतरून ५,२00 ते ५,९00 रुपये क्विंटल झाली. ठोक बाजारात डाळींचे भाव उतरत असले तरी किरकोळ बाजारात मात्र भाव अजूनही तेजीतच आहे. दिल्लीतील दुकानदार अजूनही डाळी १७0 रुपये किलोपेक्षा जास्त भावाने विकत आहेत.
जिरे उतरले
मागणी घटल्यामुळे जिऱ्याचा भाव १00 रुपयांनी उतरला. दिल्लीतील ठोक बाजारात जिरे १५,७00 ते २0,२00 रुपये क्विंलट राहिले. इलायचीचे दर ६00 ते ७२५ रुपये किलो राहिले.
मागणीत घट झाल्यामुळे ठोक बाजारात डाळी उतरल्या
सुस्त मागणी आणि पुरवठ्यात झालेली वाढ यामुळे राजधानी दिल्लीतील ठोक बाजारात निवडक डाळींचे भाव क्विंटलमागे १00 रुपयांनी उतरला.
By admin | Updated: December 8, 2015 01:57 IST2015-12-08T01:57:27+5:302015-12-08T01:57:27+5:30
सुस्त मागणी आणि पुरवठ्यात झालेली वाढ यामुळे राजधानी दिल्लीतील ठोक बाजारात निवडक डाळींचे भाव क्विंटलमागे १00 रुपयांनी उतरला.
