पणकोडोलीतील मसनेचे आंदोलन ; शाहूकालीन विहिरीचे प्रदूषणपणकोडोली : येथील शाहूकालीन विहीर अनेक वर्षांपासून केरकचरा आणि सांडपाणी यांच्या विळख्यात अडकल्याने विहिरीत प्रदूषित कचरा वाढत असल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो कचरा काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकून एक वेगळे आंदोलन केले. आठ दिवसांत विहिर स्वच्छ न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, सरपंच नाझरे यांनी दोन दिवसांत विहिर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. पणकोडोलीमधील शाहू महाराज यांच्या काळातील जुनी व ऐतिहासिक विहिरीकडे ग्रामपंचायतसहीत ग्रामस्थांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. एकेकाळी या विहिरीच्या पाण्यावरती गावचा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु काही वर्षांपासून या विहिरीला अवकळा लागली असून सद्य:स्थितीत या विहिरीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. यामध्ये कॅरीबॅग, प्लॅस्टिक बाटल्यांबरोबरच घरगुती कचराही टाकला जात आहे. त्यामुळे या विहिरीतील पाण्याचे मोंया प्रमाणात प्रदूषण होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे आज (सोमवार) मनसे कार्यकर्त्यांनी स्वत:हून यातील कचरा काढून ग्रामपंचायतीसमोर आणून टाकत एक वेगळे आंदोलन केले. सरपंच यांना लवकरात लवकर विहिर स्वच्छ करण्याचे सांगत विहिर स्वच्छ न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात शहरप्रमुख रवींद्र आडके, तालुका संघटक रवी जाधव, सुशांत जाधव, तानाजी माने, विठ्ठल केरू, विनोद वडर, सुनील वडर, सोमनाथ वडर, पूर्णानंद मुलीमुनी, आसिफ जमादार, वैभव भोजकर, बिरू मुंजाप्पा, लक्ष्मण भोमाण्णा यांच्यासहीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
विहिरीतील कचरा ग्रामपंचायतीसमोर टाकला
पणकोडोलीतील मसनेचे आंदोलन ; शाहूकालीन विहिरीचे प्रदूषण
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:59+5:302014-12-02T00:35:59+5:30
पणकोडोलीतील मसनेचे आंदोलन ; शाहूकालीन विहिरीचे प्रदूषण
